शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाक लष्करप्रमुख मुनीर संतापले होते; जैश कमांडरचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:50 IST

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भरलेल्या एका जिहादी मेळाव्यात दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मीरी उर्फ अबू मोहम्मद याने अनेक धक्कादायक कबुलनामे दिले आहेत. भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आसिम मुनीर यांनीच 'गजवा-ए-हिंद'चा नारा दिला होता, असा खळबळजनक दावा या दहशतवाद्याने केला आहे.

आसिम मुनीर यांचा भडकाऊ चेहरा समोर

रावलाकोटच्या सप्लाय बाजार चौकात जैशच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी गुरुवारी मोठी गर्दी जमवली होती. यावेळी बोलताना अबू मोहम्मदने पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाचे पितळ उघडे पाडले. तो म्हणाला की, "भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशांत चार दिवस संघर्ष झाला, तेव्हा फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी या युद्धाला 'गजवा-ए-हिंद' असे संबोधले होते." विशेष म्हणजे, भारताने जैशच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर मुनीर यांनी भारताविरुद्ध उघडपणे जिहाद पुकारण्याची घोषणा केली होती.

मसूद अजहरच्या कुटुंबाचा बहावलपूरमध्ये खात्मा

अबू मोहम्मद हा तोच दहशतवादी आहे ज्याने सर्वात आधी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाची कबुली दिली होती. मे २०२५ मध्ये भारताने केलेल्या या कारवाईत जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचे कुटुंब बहावलपूरमध्ये मारले गेले होते. पाकिस्तानने या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी 'बुनयान अल मरसूस' नावाचे अभियान चालवले होते, मात्र भारताच्या मुत्सद्देगिरीने आणि पुराव्यांनी पाकिस्तानचा हा बनाव जगासमोर फसला होता.

दहशतवाद्यांचे मेळावे आणि भारताला धमक्या

पाकिस्तानमध्ये एकीकडे 'इस्लामिक स्टेट खोरासान'ने मशिदीत घडवून आणलेल्या स्फोटात ३१ जणांचा बळी गेला असताना, दुसरीकडे पाक सरकार दहशतवाद्यांना उघडपणे रॅली काढण्यासाठी संरक्षण देत आहे.

पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघडा

स्वतःचा देश दहशतवादाने होरपळत असतानाही पाकिस्तान सरकार आणि लष्कर भारताच्या विरोधात जिहादी संघटनांना रसद पुरवत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये दहशतवाद्यांनी खुलेआम फिरून चिथावणीखोर भाषणे दिली, ज्याला स्थानिक प्रशासनाचे मूक समर्थन लाभल्याचे दिसून आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani General Declared 'Ghazwa-e-Hind' After India's 'Operation Sindoor': Jaish Commander

Web Summary : Jaish commander reveals Pakistan's support for terrorism. After India's 'Operation Sindoor,' General Munir declared 'Ghazwa-e-Hind.' Pakistan protects terrorists while facing internal terror threats.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद