शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'म्हणे, शत्रुत्वाच्या नादात भारताने मूर्खपणा केला!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:45 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारतीय हवाई दलानं घेतला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारतीय हवाई दलानं घेतला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या जवळपास 12 मिराज विमानांनी ही मोहीम फत्ते केली. त्यानंतर पाकिस्ताननं हा हल्ला झाल्याचं वृत्त फेटाळलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानी सेनेचे मेजर जनरल आसिफ गफूर यांच्या पत्रकार परिषद घेतली आहे. आमचं हवाई दलही सज्ज होतं. परंतु काळोख असल्याकारणानं आमचं हवाई दल कारवाई करू शकलं नाही. पण पुन्हा असा हमला झाल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ, असंही मेजर आसिफ गफूर म्हणाले आहेत. तसेच भारतानं शत्रुत्वाच्या नादात मूर्खपणा केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरवरून भारतीय वायुसेनेच्या हल्ल्याची माहिती आज सकाळी दिली. मुझफ्फराबाद सेक्टरमधून भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु कुठल्याही मालमत्तेचे नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानी वैमानिकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारतीय विमानांनी पळ काढला, अशा आशयाची पोस्ट आणि फोटो असिफ गफूर यांनी शेअर केले. त्यावर भारतीय ट्विटरवर युजर्स तुटून पडले आहेत. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नागरिक करत असल्याने असिफ गफुर यांच्या अकाऊंटवरही भारत-पाक ट्विटरवर युद्ध रंगले आहे. मात्र तिथेही भारतीयांचाच विजय होत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान