मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले आहे. 'अफगाणिस्तान भारतावर "प्रॉक्सी युद्ध" करत आहे', असा आरोप पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. भारत सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, 'काबूलऐवजी दिल्लीत निर्णय घेतले जात आहेत', असा आरोप आसिफ यांनी केला. त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि भारत यांच्यातील अलिकडच्या बैठकीवरही प्रश्न उपस्थित केले. 'तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा अलिकडचा सहा दिवसांचा भारत दौरा हा एक नियोजित कार्यक्रम होता, असंही आसिफ म्हणाले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. ७ मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीतील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यामुळे दोन्ही देशांमधील चार दिवसांचा संघर्ष सुरू झाला, हा पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्या विनंतीनंतर थांबवण्यात आला.
४८ तासांचा युद्धविराम
अफगाणिस्तानसोबत ४८ तासांचा युद्धविराम मान्य झाला आहे. दोन्ही देशांमधील सीमा संघर्षांमध्ये दोन्ही बाजूंनी अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. "तालिबानच्या विनंतीवरून, पाकिस्तान सरकार आणि अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीत पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविराम स्थापित करण्यात आला आहे, हे आज संध्याकाळी ६:०० वाजल्यापासून दोन्ही बाजूंच्या परस्पर संमतीने लागू होईल. अफगाण सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, "पाकिस्तानी बाजूच्या विनंती आणि आग्रहावरून, दोन्ही देशांमधील युद्धविराम संध्याकाळी ५:३० नंतर लागू होईल.
Web Summary : Amidst rising tensions, Pakistan accuses India of proxy war via Afghanistan. Pakistan's defense minister alleges decisions are made in Delhi, not Kabul. A 48-hour ceasefire is in place following border clashes. Relations strained after attacks in Kashmir and alleged Indian strikes in Pakistan.
Web Summary : तनाव के बीच, पाकिस्तान ने भारत पर अफगानिस्तान के माध्यम से छद्म युद्ध का आरोप लगाया। रक्षा मंत्री का दावा है कि फैसले काबुल में नहीं, दिल्ली में लिए जाते हैं। सीमा संघर्ष के बाद 48 घंटे का युद्धविराम लागू। कश्मीर में हमलों के बाद संबंध तनावपूर्ण।