शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:36 IST

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे.

Pakistan among biggest importer of arms:  पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. पाकिस्ताननं जगभरातून इतक्या देशांकडून कर्ज घेतलंय की इम्रान खान सरकारला आता देश चालवणं कठीण होऊन बसलं आहे. पण असं असतानाही पाकिस्तानची शस्त्रांची भूक काही भागत नसल्याचं समोर आलं आहे. आशिया खंडात शस्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचं नाव अग्रस्थानी आहे. 

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूटच्या (एसआयपीआरआय) अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे. या अहवालानुसार २०१६ ते २०२० दरम्यान आशिया खंडातील देशांकडून शस्त्रांची सर्वाधिक आयात झाली आहे. वैश्विक शस्त्र खरेदीबाबत बोलायचं झालं तर आशिया खंड सर्वात मोठी बाजारपेठ आहे. एकूण शस्त्र आयातीपैकी ४२ टक्के शस्त्रांची आयात ही आशिया खंडातील देशांकडूच होते. यात पाकिस्तानचं नाव सर्वात पुढे आहे. त्यानंतर चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची नावं आहेत. 

चीनी शस्त्रांवर अवलंबून आहे पाकिस्तान२०१६ ते २०२० या चार वर्षांमध्ये चीनकडून होण्याऱ्या शस्त्र निर्यातीत घट झाल्याचंही अहवालातून समोर आलं आहे. शस्त्रांच्या निर्यातीत जगात पाचव्या क्रमांवर असलेल्या चीनला गेल्या पाच वर्षांमध्ये मोठा धक्का बसला आहे. २०११ ते १५ आणि २०१६ ते २० यांची तुलना करायची झाल्यास चीनच्या शस्त्र निर्यातीत ७.८० टक्के घट झाली आहे. पाकिस्तान सर्वाधिक चीनी शस्त्रांवर अवलंबून आहे. पाकिस्तान हा देश चीन शस्त्रांचा मोठा ग्राहक मानला जातो. चीन शस्त्रांची खरेदी पाकिस्तान, बांगलादेश आणि अल्जेरियाकडून केली जाते. भारताने शस्त्रांची आयात केली कमी'मेक इन इंडिया'च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रांची आयात कमी करण्यावर भर दिला. २०११ ते १५ आणि २०१६ ते २० यांची तुलना केली देशाची शस्त्र आयात तब्बल ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतानं आयात कमी केल्यामुळे सर्वाधिक धक्का रशियाला बसला आहे. कारण भारत रशियाचा शस्त्र खरेदीसाठीचा मोठा ग्राहक आहे. यासोबतच अमेरिकेसोबतची शस्त्र आयातही भारतानं कमी केली आहे. यात तब्बल ४६ टक्क्यांनी आयात कमी केली आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयchinaचीनnorth koreaउत्तर कोरियाrussiaरशिया