शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! पाकिस्तानने काबुलच्या मोठ्या हॉस्पिटलवर बॉम्ब टाकला; ४०० जणांचा मृत्यू, तालिबानचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:29 IST

Pakistan Airstrike in Kabul: पाकिस्तानने काबुलमधील हॉस्पिटलवर केलेल्या हवाई हल्ल्यात ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानने याला युद्धापराध म्हटले असून परिसरात तणाव वाढला आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. सोमवारी उशिरा पाकिस्ताननेअफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये केलेल्या भीषण एअरस्ट्राईकमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका नशामुक्ती केंद्राला लक्ष्य करण्यात आले असून, मृतांचा आकडा ४०० वर पोहोचला आहे. मृतांमध्ये बहुतांश रुग्ण आणि सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचे तालिबान सरकारने म्हटले आहे.

नेमकी घटना काय?काबुलमधील एका नशामुक्ती केंद्रावर पाकिस्तानी लष्करी विमानांनी बॉम्बफेक केली. या हल्ल्यात हॉस्पिटलचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले आहेत. सुरुवातीला हा आकडा २५० सांगण्यात आला होता, मात्र अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ४०० पर्यंत वाढल्याची पुष्टी केली आहे. याशिवाय २५० हून अधिक लोक जखमी आहेत.

रमजानच्या २८ व्या रात्रीची शोकांतिकाअफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबी याने सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्याने म्हटले की, "रमजानच्या २८ व्या रात्री आशा पल्लवित करण्यासाठी आलेल्या रुग्णांची हत्या करण्यात आली, हे अत्यंत वेदनादायक आहे".

पाकिस्तानचा इन्कारपाकिस्तानने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने केवळ दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले असून कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा हॉस्पिटलवर हल्ला केलेला नाही. पाकिस्तानच्या मते, अफगाण भूमीचा वापर करून 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' हे गट पाकिस्तानवर हल्ले करत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेधपूर्व अफगाण सरकारचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून याला 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन' म्हटले आहे. तसेच स्टार क्रिकेटपटू राशिद खान यानेही हॉस्पिटल आणि रहिवासी भागांना लक्ष्य करणे हा 'वॉर क्राईम' असल्याचे म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Bombs Kabul Hospital: Hundreds Dead, Taliban Claims

Web Summary : Pakistan's airstrike on a Kabul drug rehab center killed 400, mostly patients. Taliban condemns the attack. Pakistan denies targeting civilians, claiming it struck terrorist bases. International condemnation followed.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानhospitalहॉस्पिटल