शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

पाकिस्तानने पुन्हा गायले काश्मीरचे रडगाणे, दहशतवादाबाबतचे अमेरिकेने केलेले आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 4:18 PM

इस्लामाबाद.  दि. 23 -  दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने परखड शब्दात खडसावल्यानंतर पाकिस्तानने आता पुन्हा काश्मीरचे रडगाणे गाण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याच्या अमेरिकेने केलेल्या आरोपांना आज प्रत्युत्तर देत पाकिस्तानने हे आरोप फेटाऴून लावले आहेत. भौगोलिक आणि जागतिक राजकारणात पारंपरिक प्रभाव आणि अधिपत्य कायम राखण्याची नीती दक्षिण आशियामधील शांती आणि ...

इस्लामाबाद.  दि. 23 -  दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने परखड शब्दात खडसावल्यानंतर पाकिस्तानने आता पुन्हा काश्मीरचे रडगाणे गाण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याच्या अमेरिकेने केलेल्या आरोपांना आज प्रत्युत्तर देत पाकिस्तानने हे आरोप फेटाऴून लावले आहेत. भौगोलिक आणि जागतिक राजकारणात पारंपरिक प्रभाव आणि अधिपत्य कायम राखण्याची नीती दक्षिण आशियामधील शांती आणि स्थिरतेला उत्पन्न झालेल्या धोक्यासाठी जबाबदार आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्यावरून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडसावले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा काश्मीर मुद्द्याचा राग आळवला आहे. जम्मू काश्मीरचा वाद सातत्याने चिघळत राहणे या क्षेत्रातील शांती आणि स्थिरतेसाठी सर्वात मोठा अडथळा आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानकडून देण्यात आलेली प्रतिक्रिया ही ट्रम्प यांच्या दक्षिण आशियाबाबतच्या नव्या धोरणानंतर समोर आली आहे.  याआधीच्या आपल्या प्रतिक्रियेत पाकिस्तानने अमेरिकेने केलेल्या आरोपांबाबत निराशा व्यक्त केली होती. जगातील कुठलाही देश दहशतवादाला पाकिस्तानएवढा बळी पडलेला नाही. त्यामुळे अमेरिकेने जाहीर केलेल्या वक्तव्यात दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानने दिलेल्या बलिदानाकडे कानाडोळा करणे खेदजनक असल्याचे   पाकिस्तानने म्हटले आहे.   दरम्यान,  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन मंगळावारी पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले  होते. पाकिस्तान दहशतवाद्यांना अशाचप्रकारे आश्रय देत राहिल्यास अमेरिका शांत बसून राहणार नाही, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला होता.   पाकिस्तान नेहमी हिंसा पसरवणा-यांना, दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे. अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या 20 संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहेत.  पाकिस्तान जर अफगाणिस्तानातील आमच्या कारवाईला सहकार्य करणार असेल तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी असे बरेच काही असेल, मात्र पाकिस्तान जर दहशवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला होता.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तान