शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

होय आमच्या देशात दहशतवादी आहेत, पाकिस्तानी लष्कराची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 20:47 IST

पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांबाबतचे पुरावे भारताकडून नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच मांडण्यात येत असतात. मात्र या दहशतवाद्यांचे आश्रयदाते असलेले पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्य ही बाब नाकारत असते. मात्र...

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांबाबतचे पुरावे भारताकडून नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच मांडण्यात येत असतात. मात्र या दहशतवाद्यांचे आश्रयदाते असलेले पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्य ही बाब नाकारत असते. मात्र पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी आहेत. तसेत त्यांचा बीमोड करण्यासाठी बरेच काही करण्याची गरज आहे, असे पाकिस्तानने प्रथमच कबूल केले आहे. पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हे वक्तव्य केले आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आसिफ गफूर म्हणाले की, पाकिस्तानने हिंसक कट्टरवारी संघटना आणि जिहादी गटांवर बंदी आणली आहे. तसेच आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करत आहोत. दहशतवादामुळे पाकिस्तानला बरेच नुकसान सहन करावे लागले आहे. या दहशवादाचा बीमोड करण्यासाठी बरेच काही करण्याची गरज आहे.'' इंटर सव्हिसेस पब्लिक रिलेशनचे डीजी असलेले मेजर जनरल आशिफ गफूर यांनी यावेळी दहशतवादाचा खात्मा करण्यामध्ये याआधीची सरकारे अपयशी ठरली, तसेच दहशतवादामुळे पाकिस्तानचे लाखो डॉलरचे नुकसान झाले हेही मान्य केले. याआधीची सरकारे अशा दहशतवादी गटांवर मेहेरबानी करण्यात गुंतलेली होती, तसेच प्रत्येक संरक्षण यंत्रणाही यातच गुंतलेली होती. त्यामुळे आम्हाला अशा संधटनांविरोधात रणनीती बनवण्यात अपयशी ठरलो. मात्र आता अशा दहशतवाद्यांविरोधात रणनीती बनवण्यात येत आहे, असेही गफूर यांनी सांगितले. 

काही महिन्यांपूर्वी झालेला पुलवामा हल्ला, तसेच  काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराने दिलेली ही कबुली महत्त्वाची आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद