शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाक म्हणतो, मसूद अझहर बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 04:01 IST

‘एफएटीएफ’ला दिली माहिती : कुटुंबियांचाही ठावठिकाणा नाही

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी मसूद अझहर हा पाकिस्तानातून गायब झाला आहे, तसेच त्याच्या कुटुंबियांचीही काही माहिती नाही, असे पाकिस्तानने फायनान्सियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सला (एफएटीएफ) सांगितले आहे.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी १ मे २०१९ रोजी दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. पाकिस्तान आधीपासूनच ग्रे लिस्टमध्ये आहे. त्यांच्यावर ब्लॅक लिस्ट होण्याची टांगती तलवार आहे. सध्या त्यांचे प्रकरण एफएटीएफकडे विचारासाठी गेलेले आहे. दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाकिस्तानने पर्याप्त पावले उचलली आहेत की नाही, याची पाहणी केली जात आहे.दरम्यान, आॅक्टोबरमध्ये जी बैठक झाली होती त्यात पाकिस्तानने असा दावा केला होता की, मसूद आणि त्याचा परिवार बेपत्ता आहे. भारतातील अनेक अतिरेकी घटनांमागे मसूद अझहरचा हात आहे. गतवर्षी पुलवामात १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारीही जैशने स्वीकारली होती.पाकिस्तानने असा दावा केला आहे की, संयुक्त राष्ट्रांकडून अतिरेकी म्हणून घोषित करण्यात आलेले एकूण १६ जण पाकच्या भूमीवर होते. त्यातील ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. उर्वरित ९ जणांनी संयुक्त राष्ट्रांकडे अशी मागणी केली आहे की, त्यांच्यावर लावण्यात आलेले अर्थ व प्रवास निर्बंध हटविण्यात यावेत. यात लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद, हाजी मुहम्मद अशरफ, जफर इकबाल, हाफीज अब्दुल सलाम भुट्टवी, याहया मोहम्मद मुजाहीद, आरिफ कासमानी आणि अल कायदाला अर्थपुरवठा करणारा अब्दुल रहमान यांचा समावेश आहे. सध्या या व्यक्तींचे बँक खातेही बंद करण्यात आले आहेत.

टॅग्स :masood azharमसूद अजहरPakistanपाकिस्तान