शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:56 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने घाबरलेले पाकिस्तानी नेते अणुबॉम्बची धमकी देत आहेत.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असून, भारत सरकारने पाकविरोधात अनेक कडक पावले उचलली आहेत. यामुळे पाकिस्तानात खूप अस्वस्थता असून, त्यांचे मंत्री दररोज युद्धाबाबत विविध वक्तव्ये करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी असे विधान केले आहे, ज्यामुळे अणुयुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. 

पाकिस्तानकडे किती अणुबॉम्ब आहेत?2023 मध्ये फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सने एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये पाकिस्तानच्या अणु योजनेशी संबंधित अनेक गुपिते उघड करण्यात आली होती. पाकिस्तानने आपल्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवला आहे, हेदेखील त्यात सांगितले होते. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तान दरवर्षी 14-27 अण्वस्त्रे बनवू शकेल, यासाठी या दिशेने काम करत आहे. अहवालानुसार, 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता आणि आता ही संख्या 172 झाली आहे. तर, भारताकडे सध्या 180 अण्वस्त्रे आहेत.

डोक्यावर कर्जाचा बोजावीज बिल, पेट्रोल-डिझेल, डाळी-तांदूळ, पीठ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातील जनता त्रस्त आहे. दरवर्षी तो चीन, अरब आणि इतर मुस्लिम देशांमध्ये मदतीसाठी भीक मागतो. एवढेच नाही तर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेचे त्याचे अब्जावधी रुपयांचे कर्ज आहे, जे परतफेड करण्यास सक्षम नाही. अशाप्रकारे पाकिस्तानवरील कर्जाचा भार दरवर्षी वाढत आहे. इतक्या गंभीर आर्थिक आव्हानांमध्ये पाकने आणखी अणवस्त्र बनवण्याची योजना आखली आहे.

दरवर्षी 14-17 अण्वस्त्रे बनवण्याची योजनाफेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तान अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचे उत्पादन करत आहे. अहवालात म्हटले आहे की, ज्या वेगाने ते साहित्य तयार करत आहे ते पाहता, असे दिसते की पाकिस्तान दरवर्षी १४-२७ नवीन वॉरहेड्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा साठा कुठे आहे?अहवालात असेही म्हटले आहे की, पाकिस्तान अण्वस्त्रे पोहोचवण्यासाठी मिराज III आणि मिराज V सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो. त्यांनी ही विमाने दोन हवाई तळांवर तैनात केली आहेत आणि कदाचित त्यांनी याच हवाई तळांवर आपला अण्वस्त्रांचा साठा लपवला असेल. हे एअरबेस कराचीजवळील मसरूर एअरबेस आहे. पाकिस्तानकडे सहा जमिनीवर हल्ला करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. अब्दाली, गझनवी, शाहीन I/A, नस्र, घौरी आणि शाहीन-II अशी त्यांची नावे आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत