शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात दिसला; भारतविरोधी रॅलीत हाफिज सईदच्या मुलाचीही उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:28 IST

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्याचा मास्टरमाइंड काल पाकिस्तानमध्ये एका रॅलीत दिसला आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊन एक महिना उलटला.  महिन्यानंतर, हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसुरी हा पाकिस्तानमधील एका रॅलीत समोर आला आहे. सैफुल्लाह हा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे. दरम्यान, लष्करचा पुढचा उत्तराधिकारी मानला जाणारा हाफिज सईदचा मुलगा देखील सैफुल्लाहसोबत दिसला. या रॅलीत अनेक पाकिस्तानी नेते देखील दिसले. ह उघडपणे दहशतवाद्यांसह स्टेज शेअर करत आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय "मला सोडा,मी काहीच केलं नाहीये..."

अणुचाचणीच्या यशाचा गौरव दरवर्षी पाकिस्तानमध्ये 'यूम-ए-तकबीर' म्हणून साजरा केला जातो. ही रॅली देखील याच उत्सवाचा एक भाग होती. यावेळी पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने आयोजित केलेल्या दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध विष ओकले. रॅलीमध्ये उपस्थित असलेला तल्हा सईद पहलगामच्या बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व करत असल्याचा आरोप आहे.

सशस्त्र दलांनी १५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ जणांची निर्घृण हत्या केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि नंतर गोळ्या झाडल्या. या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने घेतली होती,  त्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी १५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

पाकिस्तानमध्ये झालेल्या या भारतविरोधी रॅलीमध्ये, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश असलेल्या तल्हा सईदने जिहादी घोषणा दिल्या. तल्हा सईदने पाकिस्तानमध्ये निवडणूकही लढवली आहे. तो पीएमएमएल पक्षाशी संबंधित आहे. त्याने गेल्या काही दिवसात भारताविरोधी विधाने केली आहेत. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान