शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:54 IST

What is petn explosive : लेबनान आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात झालेल्या पेजर स्फोटांनी अवघे जग हादरले. पेजरमध्ये PETN नावाचा स्फोटक पदार्थ ठेवण्यात आला होता. याच PETN पदार्थाबद्दल जाणून घ्या...

What is a pager bomb : संपर्कासाठी वापरल्या जाणाऱ्या हजारो पेजरचा एकापाठोपाठ स्फोट झाला आणि अवघे जग हादरले. पेजर स्फोटात हजारो लोक जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. लेबनान आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात पेजर स्फोट घडवून आणण्यात आले. यामागे इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद असल्याचे म्हटले जात आहे. मोसादने हजारो पेजरमध्ये छेडछाड करत त्यात स्फोटके ठेवली. नेमके हे कसे गेले आणि त्यासाठी वापरण्यात आलेले PETN काय आहे?

पेजरमध्ये ठेवलेले बॉम्ब कसे बनवतात?

पेजरमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटक पदार्थाचे नाव आहे PETN म्हणजेच Pentaerythritol tetranitrate. हा एक रासायनिक पदार्थ आहे. Pentaerythritol tetranitrate आणि प्लास्टिसायजर एकत्र करण्यात आल्यानंतर प्लास्टिक स्फोटक बनते. प्लास्टिक बॉम्बमध्ये याला सर्वाधिक शक्तिशाली आणि धोकादायक समजले जाते. 

जर्मनीच्या लष्कराने लावला होता शोध

या बॉम्बचे वैशिष्ट्ये म्हणजे हे शोधणे म्हणजे मशीनच्या साहाय्याने डिटेक्ट करणे कठीण असते. सेंसरही या बॉम्ब शोधण्यासाठी काम करू शकत नाही. अमोनियम नाइट्रेट आणि पोटॅशियम नाइट्रेट या पदार्थांसोबत याचा वापर केला जातो. त्यामुळे ते जास्त हानिकारक बनते. या पदार्थाचा शोध जर्मनीच्या लष्कराने पहिल्या महायुद्धावेळी लावला होता.

कसे घडवून आणले पेजर बॉम्बस्फोट?

स्काय न्यूज अरबियाने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादने हिजबुल्लाहच्या पेजरमध्ये PETN बसवले होते. PETN हा पदार्थ पेजरच्या बॅटरीज वरती लावण्यात आला होता. पेजरच्या बॅटरीचे तापमान वाढवून स्फोट घडवण्यात आले. पेजरमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटक पदार्थाचे वजन २० ग्रॅमपेक्षाही कमी होते. 

तैवानमधील कंपनीचे होते पेजर

अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पेजरचे स्फोट झाले, ते तैवानमधील कंपनीचे AP924 या मॉडेलचे होते. तैवानवरून जे पेजर लेबनानमध्ये पाठवण्यात आले, त्यावेळीच त्यांच्या बॅटरीजवर हे स्फोटक लावण्यात आलेली होती. दुपारी ३.३० वाजता लेबनानमधील या पेजरवरती एक मेसेज आला. त्यानंतर स्फोटके अ‍ॅक्टिव्ह झाली होती. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBlastस्फोटIsraelइस्रायलTerror Attackदहशतवादी हल्ला