शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बॅग उचला, विमानात बसा आणि ऑफिसला जा! वाहतूककोंडी, प्रदूषण होणार इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 06:54 IST

Navi Delhi: वाहनांच्या गर्दीशिवाय मोठ्या शहरांची कल्पना करणे कठीण झाले आहे. परंतु, आता लवकरच ‘हवाई टॅक्सी’ सेवा येत असून, रोजनचा प्रवास वेगवान होणार आहे. याचवेळी ही सेवा इलेक्ट्रिक बॅटरीवर असल्याने  प्रदूषणाच्या समस्याही दूर होणार आहेत. 

नवी दिल्ली : वाहनांच्या गर्दीशिवाय मोठ्या शहरांची कल्पना करणे कठीण झाले आहे. परंतु, आता लवकरच ‘हवाई टॅक्सी’ सेवा येत असून, रोजनचा प्रवास वेगवान होणार आहे. याचवेळी ही सेवा इलेक्ट्रिक बॅटरीवर असल्याने  प्रदूषणाच्या समस्याही दूर होणार आहेत. जगात अनेक कंपन्या सरळ उभे ९० अंशाच्या कोनात उडू आणि उतरू शकणारी विमाने विकसित करत आहेत. त्याला ‘इलेक्ट्रिक हवाई टॅक्सी’ देखील म्हणतात. फ्रान्स, जर्मनी, चीन, अमेरिका अशा अनेक देशांनी येत्या वर्षभरात हवाई  टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. याचा मोठा फायदा जगाला होणार आहे.

भारताकडूनही तयारी...वाहतुकीतील अडथळ्यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे भारत ईव्हीटीओएल विमान उत्पादकांना आमंत्रित करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे.

आव्हान काय?महागडी आणि जड बॅटरी ही सर्वात मोठी समस्या आहे. व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यापूर्वी, हवाई टॅक्सीला व्यावसायिक विमानांप्रमाणेच प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी लागेल.

ब्राझील ते इस्रायल स्पर्धेतब्राझीलमध्ये २०२६ पासून फ्लाइंग टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीन २०२५ पर्यंत फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्याची योजना आखत आहेत. या स्पर्धेत इस्रायलही सामील झाला आहे. 

किती खर्च?२०४० पर्यंत ईव्हीटीओएलवरील जागतिक खर्च १०,००० कोटी रुपयांपर्यंत (एक ट्रिलियन डॉलर) पोहोचण्याचा अंदाज आहे.२०२५  पर्यंत अमेरिकेचे प्रवासी ईव्हीटीओएल बाजारपेठ ३.४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.२  अब्ज डॉलर सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप कंपनी जॉबीने आपल्या गुंतवणूकदारांकडून हवाई टॅक्सी सेवेसाठी जमा  केले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीInternationalआंतरराष्ट्रीय