शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

7 हजार भारतीयांनी अमेरिकेकडे मागितला आश्रय- 2017 ची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:35 IST

युद्ध, यादवी युद्धे, हिंसा, बळजबरीने घरे सोडावी लागणे अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये आफ्रिकन, आशियाई देशांमध्ये लोकांना विस्थापन करावे लागले आहे.

संयुक्त राष्ट्रे- गेल्या वर्षी सुमारे 7 हजार भारतीयांनी अमेरिकेकडे आश्रय मागितल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या अहवालात दिली आहे. अमेरिकेकडे इतर देशांच्या तुलनेत या वर्षी सर्वात जास्त लोकांनी आश्रय मागितल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.2017 वर्ष संपेपर्यंत 68.5 दशलक्ष लोकांना आपले घर सोडावे लागले होते. त्यातील 2017 या एका वर्षात निवासस्थान सोडाव्या लागणाऱ्या लोकांची संख्या 16.2 दशलक्ष इतकी होती.  प्रतिदिन 44 हजार 500 लोकांना विस्थापित व्हावे लागल्यामूळे जगाच्या आजवरच्या इतिहासात या वर्षाला एक विस्थापित वर्ष म्हणूनच ओळखले गेले पाहिजे.

युद्ध, यादवी युद्धे, हिंसा, बळजबरीने घरे सोडावी लागणे अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये आफ्रिकन, आशियाई देशांमध्ये लोकांना विस्थापन करावे लागले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, दक्षिण सुदान, म्यानमार येथून लोकांनी विस्थापन केलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. सीरियामधील यादवीला कंटाळून व जीव वाचविण्यासाठी या पाच वर्षांमध्ये लक्षावधी लोकांनी युरोपची वाट धरली होती.अमेरिकेकडे साल्वाडोर देशाच्या 49 हजार 500 लोकांनी आश्रय मागितला. त्यापुर्वीच्या वर्षी 33,600 साल्वाडोर नागरिकांनी आश्रय मागितला होता. व्हेनेझुएलामधील भोंगळ कारभाराला कंटाळून 29,900 लोकांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला आहे. मेक्सिकोतील 26,100, चीनमधील 17,400, हैतीच्या 8,600, भारताच्या 7,400 नागरिकांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला. जगातील 168 देशांनी अमेरिकेकडे आश्रय मागितल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतामध्ये सध्या 1 लाख 97 हजार 149 विस्थापित असून 10,519 लोकांनी भारताकडे आश्रय मागितला आहे, त्याबाबत निर्णय झालेला नाही.यावर्षभरात म्यानमारमधून 9 लाख 32 हजार लोकांनी बांगलादेशात स्थलांतर केले तर थायलंडमध्ये 1 लाख म्यानमारचे नागरिक राहात आहेत. मलेशियात 98 हजार तर भारतात 18, 100 इतके म्यानमारमधून आलेले विस्थापित आहेत.

टॅग्स :USअमेरिकाIndiaभारत