शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

जगभरात पोहोचला कोरोना; २८०० बळी, ८३००० लोकांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:57 IST

चीनमध्ये ४४ जणांचा मृत्यू; ‘व्हिसा ऑन अराईव्हल’ सेवा तूर्त बंद

बीजिंग : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात आतापर्यंत २,८०० लोकांचा मृत्यू झाला असून ८३ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. प्रत्येक देशाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये संसर्ग झालेल्या ७८ हजार ८२४ पैकी २,७८८ लोक दगावले आहेत. सर्वाधिक मृतांची संख्या हुवेई प्रांतातील आहेत. हाँगकाँगमध्ये विषाणूबाधित ९२ रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गजग्य रोगाला ‘कोविड-१९’ असे नाव दिले आहे.दक्षिण कोरियात दोन हजार लोकांना संसर्गदक्षिण कोरिया शुक्रवारी या विषाणूंचे २५६ नवीन रुग्ण आढळल्याने चीननंतर दक्षिण कोरियात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २,०२२ वर पोहोचली आहे, असे रोग नियंत्रण व प्रतिबंध विभागाने सांगितले.सर्वाधिक ९६ टक्के रुग्ण दाएगूमधील आहेत. संसर्गिंत लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिनचेंगजी चर्च ऑफ जीससच्या २ लाख १० हजारांहून अधिक सदस्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियात या विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी निम्मे लोक या चर्चशी संबंधित असल्याचे या रोगाचे हे केंद्रस्थान मानले जात आहे.चीनमध्ये नवे ३२७ रुग्णचीनमध्ये या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाने शुक्रवारी ४४ जणांचा मृत्यू झाला असून ३२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक प्रादुर्भाव हुवेई प्रांतात झाला असून चीनमध्ये एकूण ७८ हजार ८२४ लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाची साथ निर्णायक वळणावर असल्याचा इशारा दिलेला आहे. विषाणूग्रस्त देशातून चीनला येणाºया लोकांना १४ दिवस एकातांत ठेवण्याचा आदेश चीन सरकारने दिला आहे.जगाच्या पाठीवरील रुग्णांची संख्याजपानमध्ये क्रूझ जहाजावरील ७०५ जणांसह ९१८ लोकांना संसर्ग झाला असून ८ जण मरण पावले आहेत. इटलीत विषाणूबाधितांची संख्या ६५० असून आतापर्यंत येथे ८ जणांचा बळी गेला आहे. इराणमध्येही २६ जणांचा मृत्यू झाला असून २५४ रुग्ण आहेत.सिंगापूरमध्ये ९६ रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत ६०, कुवैतमध्ये ४३, थायलँडमध्ये ४९, बहरीन ३३ रुग्ण आढळले आहेत. तैवानमध्ये एकाचा मृत्यू झाला असून ३२ जणांना संसर्ग झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना