शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Taliban Vs Pakistan: ...तर पाकिस्तानवर हल्ला करण्यास फियादिन तयार; सापाच्या रुपातला तालिबान अखेर उलटलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 19:47 IST

आम्ही इस्लामाबादला आमची दुसरी राजधानी बनवू. सापाचे चुंबन घ्यायला गेलात तर सापच तुम्हाला चावेल, असा कडक शब्दांत इशारा दिला आहे. 

अमेरिकेने सोडल्यानंतर अफगाणिस्तान ताब्यात घेण्यास तालिबानी अतिरेक्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानलाच आता भोगावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. सीमावाद, दहशतवाद आणि सार्वभौमत्वाच्या नावाखाली दोन्ही देश लढत आहेत. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानला खुला इशारा दिला आहे.

तालिबानचे जनरल अब्दुल बसीर शेरझादी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याबाबतचा व्हिडीओ जारी केला आहे. इतिहासाकडे पहाल तर आम्ही आमचे संरक्षण करणे जाणतो. प्रत्येक अफगानी नागरिक पाकिस्तानचा तिरस्कार करतो. पाकिस्तानने कायद-ए-आझम जिना यांचे नाव बदलावे, ते इंग्रजांच्या नशेत होते. केवळ पैगंबर मोहम्मद कायदे आझम आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे  पण तिथे इस्लामिक काहीच नाहीय, अशा शब्दांच टीका केली आहे. 

पाकिस्तानने अमेरिकेला त्यांचे हवाई क्षेत्र वापरण्यास दिले आहे. यामुळे देखील तालिबान भडकला आहे. अफगाणिस्तानला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही आमच्यावर हल्ला केल्यास आमचे आत्मघाती हल्लेखोर तुमच्याशी लढायला तयार आहेत. आमच्याकडे हजारो आत्मघातकी बॉम्बर्स आहेत जे तुमची घरे उद्ध्वस्त करतील. आम्ही इस्लामाबादला आमची दुसरी राजधानी बनवू. सापाचे चुंबन घ्यायला गेलात तर सापच तुम्हाला चावेल, असा कडक शब्दांत इशारा दिला आहे. 

तालिबानचा हा जनरल अफगाणिस्तानातील टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानवर टीका केली होती. पाकिस्तान मुद्दाम आमच्या फळांची निर्यात करण्यास उशीर करत असतो. यापुढे आम्हाला कराची किंवा ग्वादर बंदराची गरज भासणार नाही. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीने चाबहार बंदर वापरण्यासाठी इराणसोबत करार केला आहे, असे म्हटले होते. 

ड्युरंड रेषा दोन्ही देशांमधील सीमारेषा म्हणून ओळखली जाते. परंतू, तालिबान ती मानण्यास तयार नाही. पाकिस्तानचे खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान हे भाग त्यांचे असल्याचे तालिबानचा दावा आहे. पाकिस्तान ते मानण्यास तयार नाही. पाकिस्तान ड्युरंड रेषेवर कुंपण घालत आहे, यामुळे तालिबान या पाकिस्तानी प्रयत्नांवर वेळोवेळी हल्ले देखील करत आला आहे.  

टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तान