Donald Trump: जगभरात टॅरिफवरून गोंधळ घालणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे बहुतेक टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे अमेरिकन न्यायालयाने म्हटलं. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयावर बंदी घालण्यात आलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी हा निर्णय पक्षपाती असल्याचे म्हटलं. जर शुल्क आकारले नाही तर आपला देश उद्ध्वस्त होईल आणि आपली लष्करी शक्ती लगेच नाहीशी होईल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल कोर्टाने टॅरिफला चुकीचे घोषित केल्याच्या निर्णयावर टीका केली आहे. फेडरल अपील कोर्टाने टॅरिफ कायद्यानुसार नसल्याचे म्हटल्यावर डोनाल्ड ट्रम्प आता खूप संतापले आहेत. ट्रम्प यांनी इशाराही दिला की शुल्काशिवाय अमेरिका पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याची लष्करी शक्ती त्वरित संपेल. टॅरिफमुळे अमेरिकेत ट्रिलियन डॉलर्स आले आहेत. टॅरिफशिवाय अमेरिका पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असं ट्रम्प म्हणाले. याशिवाय ट्रम्प यांनी टॅरिफला पाठिंबा देणाऱ्या न्यायाधीशांचे आभार मानले. फेडरल अपील कोर्टाने ७-४ च्या निर्णयात ट्रम्पच्या टॅरिफला चुकीचे घोषित केले होते आणि त्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता.
"जर टॅरिफ आणि आम्ही आधीच घेतलेले सर्व ट्रिलियन डॉलर्स नसते तर आपला देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता आणि आपले सैन्य लगेचच नष्ट झाले असते. ७ विरुद्ध ४ मते देणारे कट्टरपंथी डाव्या विचारसरणीच्या न्यायाधीशांच्या गटाला त्याची पर्वा नाही. पण ओबामा यांनी नियुक्त केलेल्या एका डेमोक्रॅटने प्रत्यक्षात आपला देश वाचवण्यासाठी मतदान केले. मी त्यांच्या धाडसाबद्दल त्यांचे आभार मानतो. ते अमेरिकेवर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात," असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने आपल्या निर्णयात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जवळजवळ सर्व देशांवर जड शुल्क लादण्याचा कायदेशीर अधिकार नाही. ट्रम्प यांना राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची आणि जवळजवळ सर्व देशांवर जड शुल्क लादण्याची कायदेशीर परवानगी नाही, असं म्हटलं आहे. कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेले अतिरिक्त शुल्क तात्काळ रद्द केले नाही आणि ट्रम्प प्रशासनाला सुप्रीम कोर्टात अपील करण्याची परवानगी दिली.