शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुतिनच्या धोरणांना विरोध, पाश्चात्य देशांशी संपर्क, बड्या नेत्याची हत्या, जंग जंग पछाडूनही कळेना मृत्यूचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 09:24 IST

Russia: बेलारूसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमीर मेकी यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचं या आठवड्यात अचानक निधन झालं होतं. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई ही रशियाकडे वळली आहे.

मॉस्को - बेलारूसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमीर मेकी यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचं या आठवड्यात अचानक निधन झालं होतं. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई ही रशियाकडे वळली आहे. बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झँडर लुकाशेंको यांनी त्यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहिली. तसेच तपासणीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी बेलारुसची राजधानी मिंस्क येथे मेकी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

द डेली मेलच्या रिपोर्टनुसार ६४ वर्षीय माजी गुप्तहेर आणि राजकारणी व्लादिमीर मेकी यांची एका स्टिंग ऑपरेशनमध्ये हत्या करण्यात आली होती. ते युक्रेन युद्धाबाबत पाश्चात्य देशांच्या संपर्कात होते, तसेच बेलारुसला रशियामध्ये विलीन करून घेण्याच्या पुतीन यांच्या प्रयत्नांना त्यांचा विरोध होता, असा दावा करण्यात येत आहे. मीडियामधील वृत्तानुसार मेकी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा स्टाफचीही लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात येत आहे.

दरम्यान, मेकी यांच्या मृत्युमुळे राष्ट्रपती अलेक्झेंडर लुकाशेंको यंना धक्का बसला आहे. तसेच ते त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतीत आहेत. रशिया आपली हत्या करू शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे नोकर आणि भोजन करणारे स्वयंपाकी बदलले आहेत, असा दावा करण्यात येत आहे. लुकाशेंको यांनी बेलारूसचं सैन्य तैनाक करून पुतिन यांच्या युद्धाला पाठिंबा देण्यास नकार आणि रशियामध्ये आपल्या देशाला सामील करून घेण्यास विरोध केल्यानंतर मेकीच्या मृत्यूच्या शक्यतांना बळ मिळालं आहे. पुतिन यांचे विरोधक आणि निर्वासित व्यावसायिक नियोनिद नेव्जलिन यांनी आरोप केला की मेकी यांचा मृत्यू एफएसबीच्या स्पेशल लॅबमध्ये तयार झालेल्या विषामुळे झाला आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन