शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:58 IST

Pakistan News: आज कराची येथून सिंधमधील नवाबशाह येथे जात असलेल्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्या आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या कन्या असिफा भुत्तो जरदारी यांच्या ताफ्याला आंदोलकांनी रस्त्यात घेराव घातला.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत असंतोष उफाळत असून, बलुचिस्ताननंतर आता सिंध प्रांतातही मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत आहेत. याचा फटका आता पाकिस्तानमधील सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांनाही बसत आहेत. दरम्यान, आज कराची येथून सिंधमधील नवाबशाह येथे जात असलेल्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्या आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या कन्या असिफा भुत्तो जरदारी यांच्या ताफ्याला आंदोलकांनी रस्त्यात घेराव घातला.

जमशोरो टोल नाक्याजवळ ही घटना घडली. कालव्याच्या योजनेला विरोध करत असलेल्या आंदोलकांनी असिफा भुत्तो यांच्या ताफ्याला काही काळ अडवून ठेवण्यात आले. तसेच लाठ्या-काठ्या घेऊन या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

आम्ही वादग्रस्त कालवा योजना आणि कॉर्पोरेट फार्मिंगला विरोध करत होतो, असे आंदोलकांनी सांगितले. ही योजना शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करत असिफा झरदारी यांच्या वाहनाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. तसेच ताफ्याला सुखरूपपणे तिथून बाहेर काढले.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सिंध येथील जमशोरोचे एसएसपी जफर सिद्दिकी यांनी सांगितले की, असिफा झरदारी यांचा ताफा एक मिनिटापेक्षा कमी कालावधीसाठी अडवण्यात आला. त्यात कुठलंही नुकसान झालेलं नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था भंग झाली तर पोलीस त्वरित कारवाई करतील.  त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तसेच काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. जर कुणी सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय