शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ संसद बरखास्त करण्यास विरोध; आज देणार आव्हान राजकीय हालचालींना वेग : राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रचंड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:49 IST

Nepal Parliament: राष्ट्रपतींनी प्रतिनिधी सभा बेकायदेशीररीत्या बरखास्त केली, असा विरोधकांचा आरोप असून, सर्वोच्च न्यायालयात ते रविवारी रिट याचिका दाखल करण्याच्या विचारात होते. परंतु पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे ऐनवेळी तो निर्णय उद्यावर ढकलण्यात आला.

काठमांडू : नेपाळचीसंसद बरखास्त करण्याच्या निर्णयास विरोधी पक्ष सोमवारी आव्हान देणार आहेत. राष्ट्रपतींनी प्रतिनिधी सभा बेकायदेशीररीत्या बरखास्त केली, असा विरोधकांचा आरोप असून, सर्वोच्च न्यायालयात ते रविवारी रिट याचिका दाखल करण्याच्या विचारात होते. परंतु पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे ऐनवेळी तो निर्णय उद्यावर ढकलण्यात आला.सीपीएन-माओवादी केंद्राच्या नेत्याच्या हवाल्याने हिमालय टाइम्सने म्हटले आहे की, विरोधक सोमवारी सकाळी १० वाजता याचिका दाखल करणार आहेत. रविवारचा दिवसभर विरोधक बैठका घेण्यात व खासदारांच्या सह्या घेण्यात व्यग्र होते. यात माओवादी केंद्र, नेपाळी काँग्रेस, जनता समाजवादी पार्टी-नेपाळ, राष्ट्रीय जनमोर्चा व सत्तारूढ सीपीएन-यूएमएल पक्षाच्या माधव नेपाळ गटाचा समावेश होता. एका नेत्याने दावा केला आहे की, सह्या गोळा करण्याची मोहीम समाप्त झालेली नसली तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्येच्या खासदारांनी सह्या केल्या आहेत.राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी शनिवारी २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभा (नेपाळी संसदेचे कनिष्ठ सभागृह) पाच महिन्यांत दुसऱ्यांदा बरखास्त केले व १२ आणि १९ नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका घेण्याची घोषणा केली. अल्पमतातील सरकारचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी ओली व विरोधी आघाडीचे सरकार स्थापनेचे दावेही फेटाळून लावले होते. विरोधक झाले आक्रमकnसंसद पुन्हा बरखास्त करण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी त्याला आव्हान देण्याचे ठरविले आहे.nसंसदेत बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांसमवेत मिळून राष्ट्रपती देशाचे संविधान व लोकशाहीवर हल्ला करीत असल्याचा आरोपही केला.nनेपाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.nडिसेंबर २०२०मध्ये ओली यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी संसद पहिल्यांदा बरखास्त केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये हा निर्णय रद्दबातल ठरविला होता.

टॅग्स :NepalनेपाळParliamentसंसदCourtन्यायालय