Operation Sindoor: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारेपाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे खूप नुकसान झाले. पण, सुरुवातीला पाकिस्तानने नुकसान झाल्याचे मान्य करत नव्हता. आता पाकिस्तानी नेते मोठे नुकसान झाल्याचे मान्य करत आहेत. मरियम नवाज यांनी पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्याचे कबूल केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पुतणी आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या मान्य करताना दिसतात की, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला असून, याद्वारे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. अमित मालवीय म्हणतात की, पाकिस्तानी नेते नुकसान झाल्याचे मान्य करत आहेत, तर विरोधी पक्षनेते आपल्याच सैन्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
ऑपरेशन सिंदूरगेल्या महिन्यात 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना धर्म विचारुन गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून 6-7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले अन् पाकिस्तानासह पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्या कारवाईत सुमारे शंभर दहशतवादी ठार झाले, तर त्यांचे अड्डे पूर्णपणे नष्ट झाले.
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
या कारवाईमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने अनेक भारतीय लष्करी तळ आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण, भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने पाकचे मनसुबे उधळून लावले.