एकीकडे आकाशातून हल्ले होत असताना पाकिस्तानात नागरिकांना भूकंपाचे झटके देखील सहन करावे लागले आहेत. यामुळे घरात लपलेल्या पाकिस्तानी नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाली होती. रात्री १.४४ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले आहेत.
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
शनिवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास भारताने हवाई हल्ले सुरु केले होते. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळांवर हे हल्ले करण्यात आले. लढाऊ विमानांनी क्षेपणास्त्रे डागून हे हल्ले होत असतानाच जमिनही हादरल्याने पाकिस्तान्यांची भितीने गाळण उडाली होती. ४ रिश्टर स्केलचे हे धक्के असल्याचे पाकिस्तानच्या भूकंप मापन केंद्राने स्पष्ट केले.
एकीकडे कानठळ्या बसविणारे आवाज, आगीचे लोळ आकाशात दिसत असताना दुसरीकडे घरात पलून बसलेले पाकिस्तानी घराबाहेर धावू लागले. या भूकंपामुळे काही नुकसान झाले की नाही हे समजू शकलेले नाही. बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा शहराजवळ या भूकंपाचे केंद्र होते.
दरम्यान, भारताने पाकिस्तानी हवाई हल्ला परतवून लावल्यानंतर पाकिस्तानवर जोरदार हवाई हल्ले सुरु केले आहेत. भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोरकोट) हवाई तळांना लक्ष्य केले आहे, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे.