शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

व्यापार युद्धावर अमेरिकेशी बोलण्यासाठी दरवाजे खुले - चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 01:51 IST

अन्यथा अखेरपर्यंत लढा देण्याचाही दिला इशारा

सिंगापूर : अमेरिकेसोबत सुरू असलेले व्यापार युद्ध आणि दक्षिण चीन सागरावरून तणाव वाढत असताना चीनने चर्चेसाठी दरवाजे खुुले असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, अमेरिकेला खुमखुमी असेल, तर अखेरपर्यंत लढा देण्याची तयारी असल्याचा इशाराही चीनने दिला.आयआयएसएस शांग्री-ला परिसंवादात बोलताना चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगहे यांनी अमेरिकेसोबत चर्चेची तयारी दाखविताना अखेरपर्यंत लढा देण्याची तयारी दाखविली.

अमेरिका आणि चीनदरम्यान गेल्या एक वर्षापासून व्यापारावरून वाद चालू आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनच्या उत्पादनांवर २५० अब्ज डॉलरचे शुल्क लावल्याने दोन्ही देशांदरम्यानचा तणाव अधिकच चिघळला आहे. मागच्या ५३९ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचलेली व्यापारी तूट चीनने कमी करावी, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आहे. बौद्धिक संपदा हक्काचे रक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि चिनी बाजारपेठेत अमेरिकी उत्पादनांना प्रवेश देण्यासाठी उपाय योजण्यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे.

अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापारी संघर्षाबाबत ते म्हणाले, अमेरिकेची चर्चा करण्याची इच्छा असेल, तर आमचे दरवाजे खुले आहेत. त्यांना खेटायचे असेल, तर आमचीही तयारी आहे. लष्करातील रेन झेंफेई हे जरी संस्थापक असले, तरी हुआवै ही लष्करी कंपनी नाही. रेंग झेंफेई यांनी लष्करात होते म्हणून ही कंपनीही लष्कराचा एक भाग आहे, असे समजणे उचित नाही.

विदेशी धोरणाच्या हिताविरुद्ध कामअमेरिकेने हुआवै कंपनीला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून १६ मे रोजी बंदी यादीत टाकले आहे. यामुळे अमेरिकी कंपन्यांना हुआवै कंपनीच्या उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. हुआवै कंपनी राष्ट्रीय सुरक्षा आणि विदेशी धोरणाच्या हिताविरुद्ध काम करीत आहे, असा आरोप अमेरिकेच्या वाणिज्य खात्याने केला आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन