शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती बिकट! श्रीलंकेतील पेट्रोलपंपावर NO Petrol चे बोर्ड; दिवसातून 15 तास वीजपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:13 IST

श्रीलंकेतील अनेक पेट्रोल पंपावर "नो पेट्रोल"च्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. पेट्रोल मिळेल या आशेनं नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत.

श्रीलंका सध्या विविध प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. याच दरम्यान श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी एकच दिवस पुरेल इतका इंधनसाठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. यानंतर श्रीलंकेतील अनेक पेट्रोल पंपावर "नो पेट्रोल"चे बोर्ड लावण्यात आले आहेत. पेट्रोल मिळेल या आशेने नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. यासोबतच महागाईसह देशात अन्नधान्य़ाचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात "देशात केवळ एक दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक आहे. तेलाच्या तीन शिपमेंट आयात करण्यासाठी लागणारे डॉलर्सही सरकार जमा करू शकत नाही. तेलाची जहाजं पेमेंटसाठी कोलंबो बंदराबाहेर वाट पाहत आहेत" असं म्हटलं आहे. देशभरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर नो पेट्रोलचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही तासांत देशातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. 

श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात विक्रमी स्तरावर महागाई वाढली आहे. दिवसातून तब्बल 15 तास वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. अशात देशातील लाखो लोकांना अन्न, इंधन आणि औषधं पुरवण्यासाठीही सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

श्रीलंकन सरकारला खर्च चालवण्यासाठी 2.4 ट्रिलियन श्रीलंकन रुपयांची गरज आहे. मात्र सरकारला महसूल केवळ 1.6 ट्रिलियन इतका आहे. श्रीलंका संकटात सापडल्यापासून पहिल्यांदाच सरकारकडून सत्यता स्वीकारण्यात आली आहे. श्रीलंकेकडे असलेली परकीय गंगाजळी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करता येत नाही आहेत. श्रीलंकेची सरकारी एअरलाईन्स तोट्यात आहे. हा तोटा लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे एअरलाईन्सचं लवकरच खासगीकरण करण्यात येईल, असं विक्रमसिंघे यांनी सांगितलं. 

टॅग्स :Petrolपेट्रोलSri Lankaश्रीलंका