भूकंपानंतरअफगाणिस्तानात बचाव कार्य करण्यात आले, त्यात केवळ पुरुष आणि लहान मुलांना वाचवण्यात आले, परंतु महिला आणि मुलींना मलब्याखाली मरण्यासाठी सोडून दिले. तालिबानमधील एका कायद्यामुळे अफगाणी महिलाभूकंपाच्या मलब्याखाली गुदमरून मृत्युमुखी पडल्या. अफगाणिस्तानात अलीकडेच भूकंप आला, त्यात २२०० लोकांनी जीव गमावला. परंतु हे संकट केवळ मलब्यापुरते मर्यादित राहिले नाही तर तालिबानातील एक कठोर कायदा यातील अनेक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक इमारती, घरे ढासळली, त्यानंतर मलबा काढण्यासाठी कार्य सुरू करण्यात आले. त्यात पुरुष आणि लहान मुले यांना आधी वाचवण्यात आले. परंतु महिला आणि मुली अडकल्या. कारण...तालिबानचा एक कायदा...परपुरुष कुठल्याही महिलेला हात लावू शकत नाही. जर एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनच्या ठिकाणी महिला बचावाला नसेल तर जखमी महिलेला मलब्यातून बाहेर काढणे कठीण होते. तालिबानी कायद्यानुसार अज्ञात पुरुषांना एखाद्या अनोळखी महिलेला हात लावला तर त्याला कठोर शिक्षा मिळते.
तालिबान राजवटीत महिलांबाबत अनेक कडक नियम आणि कायदे आहेत, ज्यांना "लैंगिक कायदे" म्हणतात. त्यापैकी काही सर्वात महत्वाचे आहे. अफगाणिस्तानात कोणतीही महिला तिच्या कुटुंबाबाहेरील कोणत्याही पुरुषाला (वडील, भाऊ, पती किंवा मुलगा वगळता) स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच कोणताही पुरुष बचाव पथकातील असला तरीही ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेला मदत करण्यास घाबरतो. तालिबानने महिलांना वैद्यकीय शिक्षण आणि इतर व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. परिणामी तेथे जवळजवळ महिला डॉक्टर, परिचारिका किंवा बचाव कर्मचारी नाहीत.
अफगाणिस्तानात महिला जवळच्या पुरुष नातेवाईकाशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी पुढेही येऊ शकत नाहीत. सहावीनंतर मुलींचे शिक्षण बंद करण्यात आले आहे. याचा परिणाम दीर्घकाळात महिला व्यावसायिकांच्या कमतरतेवर होत आहे. बऱ्याचदा महिलेला ढिगाऱ्याखालीच ठेवले जाते. अफगाणिस्तानात केवळ ढिगारा हटवण्याचं आव्हान नाही तर समाजाचा कायदाही बचाव कार्यात अडथळा ठरत आहे. एक महिला रक्ताने माखलेली होती, तरीही तिला कुणी हात लावला नाही. तालिबानी कायद्याची भीती पुरुषांच्या मनात इतकी आहे की त्यांनी महिलांना हात लावला नाही. त्यांना तसेच मरण्यासाठी सोडून दिले.