शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने एकजुटीने आवाज उठवणं गरजेचं - शी जिनपिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 11:29 IST

'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे'

बीजिंग, दि. 4 -  'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे', असं आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

'जगभरात अनेक बदल होत असून, यामध्ये ब्रिक्स महत्वाची भूमिका बजावत आहे. ग्लोबल गव्हर्नन्समध्ये आपण अॅक्टिव्ह सहभाग घेणं गरजेचं आहे. आपण सहभाग घेतल्याशिवाय जगासमोर असणा-या अनेक समस्या सुटणार नाहीत', असं शी जिनपिंग बोलले आहेत. 'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे', असं शी जिनपिंग यांनी सांगितलं. तसंच 'आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे', असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचं आवाहन केलं आहे. 'शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचं तज्ञ सांगत आहेत. 

चीनमधील शियामेन शहरात होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, एकत्रितपणे शांती आणि विकासाचं ध्येय साध्य केलं जाऊ शकतं असं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. सोमवारी संध्याकाळी होणा-या संयुक्त निवेदनात मोदी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील असं बोललं जात आहे. चीनने मात्र याआधीच मोदींनी असं करु नये असा इशारा दिला आहे. 

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - - विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.- आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. - भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे.  

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी