शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाल्यावर विमानात प्रवेश करण्याची परवानगी मिळते का?

By कुणाल गवाणकर | Updated: October 24, 2020 11:47 IST

US Visa: अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय अमेरिकेचे कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन अधिकारी घेतात. प्रवासी किती दिवस अमेरिकेत राहू शकतो, याचा निर्णय घेण्याचा अधिकारदेखील त्यांनाच असतो.

प्रश्न- मला व्हिसा मंजूर झाल्यावर मला अमेरिकेला जाणाऱ्या विमानात प्रवेश करण्याची परवानगी मिळते का?उत्तर- अमेरिकेचं नागरिकत्व आणि वास्तव्याचा दर्जा पाहून काही एअरलाईन्स विमानात प्रवेश देत नाहीत. अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांनी थेट व्यवसायिक विमान कंपन्यांशी संपर्क साधावा. अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासाला याबद्दल कोणताही अधिकार नाही. अमेरिकेला जाण्यासाठी प्रवास करता यावा यासाठी दूतावास कोणतंही प्रमाणपत्र देत नाही.अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा, वैध ग्रीन कार्ड आणि वैध पासपोर्ट असायला हवा. तुमचा व्हिसा नेमका कधीपर्यंत वैध आहे, याची तारीख तुम्ही व्हिसावर तपासू शकता. अमेरिकेचे इमिग्रेशन कायदे पाहता वैध व्हिसाच्या आधारावर प्रवाशाला अमेरिकेत प्रवेश मिळेलच याची खात्री देता येत नाही. व्हिसामुळे प्रवाशाला अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहोचता येतं. मात्र अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय अमेरिकेचे कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन अधिकारी घेतात. प्रवासी किती दिवस अमेरिकेत राहू शकतो, याचा निर्णय घेण्याचा अधिकारदेखील त्यांनाच असतो.राष्ट्राध्यक्षांनी केलेली घोषणा तुम्ही अमेरिकेत आल्यानंतर १४ दिवसांसाठी लागू आहे. शेंगन प्रांतासाठीदेखील हा नियम लागू आहे. राष्ट्राध्यक्षांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या घोषणांची माहिती https://www.whitehouse.gov/presidential-actions/ वर उपलब्ध आहे.अमेरिकेला पोहोचण्याआधी प्रवाशांनी प्रत्येक राज्याच्या कोविड संबंधित मार्गदर्शक सूचना लक्षात घ्याव्या. क्वारंटिन आणि सेल्फ आयसोलेशनचे नियम राज्यांनुसार बदलतात. प्रत्येक राज्यानं प्रवेशाच्या नियमावलीची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. क्वारंटिन आणि चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या संकेतस्थळाला (cdc.gov) भेट द्या.अमेरिकेत प्रवेश केल्यावर प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जातं. त्यावेळी त्यांना तिथे वैद्यकीय इतिहास, सध्याची परिस्थिती आणि स्थानिक आरोग्य यंत्रणेबद्दलच्या संपर्काबद्दलची माहिती विचारली जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.नियमावली आणि मार्गदर्शक सूचना कधीही बदलू शकतात याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवासाबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांची अपडेटेड माहिती जाणून घेण्यासाठी travel.state.gov ला भेट द्या आणि भारताशी संबंधित नियमावली जाणून घेण्यासाठी in.usembassy.gov/covid-19-information/ ला भेट द्या.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा