शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Omicron Variant: ओमायक्रॉनसमोर बूस्टर डोस फेल? लसीचे कवच भेदून शरीरात शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 05:55 IST

जगभरात अनेक ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली होती. दक्षिण अफ्रिकेत तसे अनेक रुग्णही आढळले आहेत. 

लसीचे दोन्ही डोस पूर्ण केल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जगभरात बूस्टर डोस देण्याबाबत चर्चा जोरात सुरू आहे. काही देशांनी बूस्टर डोस देणेही सुरू केले आहे. मात्र, कोरोनाचा नवा विषाणू या बूस्टरने निर्माण केलेले कवच भेदून शरीरात जागा मिळवत असल्याचे पुढे आले आहे. बूस्टर डोस घेलेल्याला एका व्यक्तिलाच सिंगापूरमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

५९ देशांमध्ये पसरला ओमायक्रॉन

दक्षिण अफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ५९ देशांमध्ये त्याचा शिरकाव झाला आहे.

कवचकुंडले भेदून संसर्ग?

जगभरात अनेक ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली होती. दक्षिण अफ्रिकेत तसे अनेक रुग्णही आढळले आहेत. पहिल्यांदाच सिंगापूरमध्ये बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तिलाही ओमायक्रॉन झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे लसीचे कवच भेदण्यात सध्यातरी ओमायक्रॉन यशस्वी होत असल्याचे दिसते.

भारतात किती रुग्ण?

भारतात आतापर्यंत २६ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचे निदान झाले आहे. या सर्वांमध्ये हलक्या स्र्वरुपाची लक्षणे आढळली आहेत.

संशोधन काय सांगते?याबद्दल नुकतेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार लस घेतल्यानंतर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती २० टक्क्यांहून अधिक शिल्लक असेल तर विषाणूची बाधा होण्याची शक्यता कमी असते. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या