शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मोठी बातमी! 'Omicron' ला हलक्यात घेणं पडेल भारी; कोरोनाबाबत WHO चा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 13:39 IST

WHO नुसार, कोविड १९ महामारीत जगभरात मागील आठवड्यात कमी चाचणी झाली तरी ११ मिलियनपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दक्षिण कोरियात तर एकाच दिवसाला ४ लाख रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. कोरोना महामारीवर(Coronavirus) नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं वाटत असतानाच पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) तंत्रज्ञान प्रमुख मारिया वैन कारखेव(Maria Van Kerkhove) यांनी कोरोनाशी निगडीत ३ चुकीचे फॅक्ट्स सांगितले आहेत.

एका पत्रकार परिषदेत मारिया वैन कारखेव म्हणाल्या की, आमच्याकडे कोरोना महामारीबद्दल चुकीच्या अफवा पसरल्याची माहिती आली आहे. ३ चुकीच्या अफवांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. यातील पहिलं म्हणजे कोविड १९ महामारी संपुष्टात आली आहे. दुसरी ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंट काही गंभीर नाही आणि तिसरं म्हणजे कोरोनाचा हा शेवटचा व्हेरिएंट होता असं कारखेव यांनी सांगितले.

WHO नुसार, कोविड १९ महामारीत जगभरात मागील आठवड्यात कमी चाचणी झाली तरी ११ मिलियनपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोना रुग्णसंख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. BA.2 आतापर्यंतचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचं आढळलं आहे. लोकसंख्येच्या स्तरावर BA.1 पेक्षा BA.2 मध्ये गंभीरता कमी आहे. अधिकांश हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल. तेच वाढलेल्या मृत्यूचं कारण बनेल असं कारखेव यांनी म्हटलं आहे.

चिंता वाढली, पण भारताला थोडा दिलासा

ओमायक्रॉन या सब व्हेरिएंटमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे. मात्र, भारतातील या सब व्हेरिएंट संबंधित धोक्याबद्दल आरोग्य तज्ज्ञ फारसे चिंतित नाहीत. याचे सर्वात मोठे कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाढलेली प्रतिकारशक्ती असल्याचे सांगितले जात आहे.भारतात गेल्या वर्षी डिसेंबर ते या वर्षी फेब्रुवारी दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढला होता.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरस ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला होता. या व्हेरिएंटमध्ये ५० हून अधिक म्यूटेशन होते. दरम्यान, सुरुवातीला हा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असल्याने भीती निर्माण झाली, परंतु नंतर गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले. अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने लोकांमधील भितीच वातावरण संपलेले आहे. परंतु तेच पाहता WHO नं लोकांना सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना