शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलंच! एका सांडने गायब केली चक्क ८०० घरांची वीज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:17 IST

विशेष म्हणजे त्या खांबावर 11,000 वॉल्टच्या वायर होत्या. विजेचा खांबाला स्पर्श करणे हे खूप घातक ठरू शकले असते.

आजपर्यंत चक्रीवादळाने आणि जोरदार पावसाने वीज गेल्याचे आपण ऐकले आहे. मात्र आता एका सांडामुळे वीज गायब झाली आहे, वाचून थोडे चक्रावले आहात ना. पण हे खरं आहे. स्कॉडलँडमध्ये हा आगळावेगळा प्रकार घडला असून, बीबीसीने याबाबतचे वृत्त दिले आहे. सांडाचे नाव रॉन आहे. रॉन हा चार वर्षांचा आहे. रॉन मोकळ्या जागेत फिरत होता. त्यानं विजेच्या खांबावर पाठ घासायला सुरुवात केली.

 विजेच्या ताराला अशा प्रकारे जोराने हलवल्याने ट्रान्सफॉर्मर बॉक्स तुटला. त्यामुळे गावातील 800 घरांची वीजच गायब झाली. विशेष म्हणजे त्या खांबावर 11,000 वॉल्टच्या वायर होत्या. विजेचा खांबाला स्पर्श करणे हे खूप घातक ठरू शकले असते. तरीही रॉन त्यातून बचावला. विशेष म्हणजे त्याला विजेचा झटकाच लागला नाही हे मोठे आश्चर्यचकित करणारे आहे. 

एका गावक-याने हा सर्व किस्सा पाहिला. ही व्यक्ती त्यावेळी शेतातील गायींना खायला घालत होती. त्यावेळी ही घटना घडली, शेतातील अनेक ताराही तुटल्या होत्या. रॉनमुळे परिसरातील वीज गेल्याने संपूर्ण रात्र गावक-यांना अंधारातच काढावी लागली. लोक मोठ्या अडचणीत सापडले होते. अभियंते आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विजेचा खांब दुरुस्त केला आणि वीजपुरवठा सुरळीत केला. घडलेला प्रकार ऐकून  त्यांनाही आश्चर्य वाटले की, एका सांडामुळे इतके मोठे नुकसान झाले आहे.