शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Good News: 113 वर्षांच्या आजी ठणठणीत बऱ्या; कोरोनाला हरवणारी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 15:02 IST

जोपर्यंत कोरोनाची लस तयार होत नाही तोपर्यंत नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे तेथील पंतप्रधानांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

देशभरात कोरोना व्हायरसनं अक्षरश: थैमान घातलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत लाखो रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये मृतांच्या संख्येत आता घट झाली आहे. कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. स्पेनमध्ये राहणाऱ्या मारिया ब्रायनस यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र मारिया यांनी  कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे. मारिया यांचे वय हे ११३ आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळली होती. 

त्यानुसार मारिया यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. मे महिन्याच्या सुरूवातीला त्यांच्याववरील उपचार यशस्वीपणे पार पडले आणि टेस्ट केल्यानंतर त्यांचा  रिपोर्ट निगेटिव्ह आला. वयाच्या ११३ व्या वर्षी वयाच्या कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिल्यानं मारिया यांचे जगभरात कौतुक होत आहे. मारिया यांचे वय जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची विशेष काळजी घेतली. आज मारिया कोरोनामुक्त झाल्या आहेत. हे देखील एका चमात्कारापेक्षा कमी नाही.

मारियाप्रमाणेच स्पेनमध्ये 101 वर्षांच्या इतर दोन वयस्कर महिलांनीदेखील कोविड-19 वर मात केली आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक संक्रमणाची प्रकरणे आहेत. स्पेन जगातील दुसरा सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. आतापर्यंत २ लाख ६८ हजार १४३ प्रकरणे आढळली आहेत, तर २६ हजार ७४४ मृत्यू झाले आहेत. इतर देशांप्रमाणे स्पेनमध्येदेखील संसर्ग रोखण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे तेथील पंतप्रधानांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या