US-Iran War: मध्यपूर्वेतील भीषण परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा संकटाचा परिणाम आता श्रीलंकेवरही झाला असून, श्रीलंका सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नागरिकांनी इंधनाचा वापर मर्यादित आणि विचारपूर्वक करावा, असे आवाहन सरकारने केले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सरकारनेही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
सरकारला दरमहा मोठा तोटा
श्रीलंका सरकारने सांगितले की, सध्याच्या दराने इंधन विक्रीमुळे सरकारला दरमहा सुमारे २० अब्ज रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सरकारला एक लिटर डिझेलवर सुमारे १०० रुपयांचा तोटा, तर एक लिटर पेट्रोलवर सुमारे २० रुपयांचा तोटा होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेलचे नवे दर
सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. नवीन दरानुसार, डिझेल ३८२ रुपये प्रति लिटर (७९ रुपयांनी वाढ), सुपर डिझेल ४४३ रुपये प्रति लिटर (९० रुपयांनी वाढ), ऑक्टेन ९५ पेट्रोल ४५५ रुपये प्रति लिटर (९० रुपयांनी वाढ) आणि ऑक्टेन ९२ पेट्रोल ३९८ रुपये प्रति लिटर (८१ रुपयांनी वाढ) करण्यात आली आहे.
एका आठवड्यात दुसऱ्यांदा दरवाढ
श्रीलंकेत एका आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सलग दोन वेळा दरवाढ झाल्यानंतर इंधनाचे दर २०२२ च्या आर्थिक संकटाच्या काळातील पातळीच्या जवळ पोहोचले आहेत.
इंधन बचतीचे सरकारचे आवाहन
जागतिक तेल बाजारातील अस्थिरता आणि संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका सरकारने नागरिकांना इंधन आणि वीज वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे. इंधन बचतीसाठी सरकारने वाहनांसाठी क्यूआर कोड प्रणाली लागू केली असून त्यानुसार ठराविक प्रमाणातच इंधन दिले जात आहे.
Web Summary : Following Pakistan, Sri Lanka faces an energy crisis. Fuel prices increased by 25% due to global factors. The government urges citizens to conserve fuel amid rising losses and instability, implementing fuel rationing via QR codes.
Web Summary : पाकिस्तान के बाद श्रीलंका ऊर्जा संकट से जूझ रहा है। वैश्विक कारणों से ईंधन की कीमतें 25% तक बढ़ गईं। सरकार नागरिकों से ईंधन बचाने का आग्रह करती है, क्यूआर कोड के माध्यम से ईंधन राशनिंग लागू की गई है।