शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांचा जर्मनीत निवडणूक प्रचार, अँजेला मर्केलसाठी लढवतायत खिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 21:30 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे.

बर्लिन, दि. 14 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत वाशिंगटनमध्ये राहत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे जर्मनीत मर्केल यांनी प्रचारासाठी ओबामांचे पोस्टर्स वापरले आहेत. येत्या २४ सप्टेंबरला जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यात सध्याच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल या चौथ्यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात यंदा प्रथमच एक नवल जर्मन नागरिकांना पाहायला मिळाले आहे. मर्केल यांच्या निवडणूक प्रचार पोस्टर्समध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांची मर्केल यांना समर्थन द्या असे सांगणारी पोस्टर झळकली आहेत. बर्लिन मधील रस्ते, चौक, पार्क व स्टेशन्स अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी लागलेली ही पोस्टर कुतुहलाचा विषय बनली आहेत.

अमेरिकेतील निवडणुकातही डेमोक्रॅटीकच्या उमेदवार हिलरी किलंटन यांच्या प्रचारासाठीही त्यांना समर्थन द्या असे सांगणारी ओबामा यांची पोस्टर लावली गेली होती. मर्कल यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये काळा, लाल व गोल्ड कलरचा वापर केला गेला आहे. तसेच या पोस्टर्सवर मर्केल यांच्या क्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचा लोगोही आहे. या पोस्टरमागे असा संदर्भ आहे की जेव्हा ओबामा जर्मनी भेटीवर आले होते तेव्हा एका भाषणात यांनी मी जर जर्मन मतदार असतो तर मर्केल यांनाच मत दिले असते असा उल्लेख केला होता. ओबामा यांच्या अपीलाचा फायदा मर्केल यांना मिळावा यासाठी ही पोस्टर्स लावली गेली आहेत.

अर्थात निवडणूक तज्ञांच्या मतानुसार मर्केल यांना निवडणूक जिंकण्यासाठी ओबामा यांच्या असल्या मदतीची अजिबात आवश्यकता नाही. त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे ओबामा पोस्टर्स संबंधी त्यांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेने मर्केल यांचा सल्ला घेतलेला नव्हता तसेच ओबामा फौंडेशनलाही या संदर्भात कांहीही माहिती दिली गेलेली नाही असे समजते. तरीही ओबामा यांच्या पोस्टर्सना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.फ्रान्स जनतेला राष्ट्राध्यक्ष म्हणून हवे होते बराक ओबामावर्षाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये राष्ट्रध्यक्ष पदासाठी निवडणूका झाल्या होत्या. यावेळी फ्रान्स जनतेला राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा हवे होते. ओबामा२०१७ संकेतस्थळाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष व्हावे यासाठी याचिका तयार केली. तसेच जनतेला या याचिकेला समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी करण्याचे जाहीर आवाहन केले. या संकेतस्थळाला फ्रान्सवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळलाहोता. 27000 लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या.