शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:31 IST

भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ करत कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पाकिस्तानात असलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, १३ पैकी ११ एअरबेसना लक्ष्य करण्यात आले होते. यासह ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली. याच दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर स्थित अण्वस्त्रांना ही हादरा बसल्याचे बोलले जात होते. यावर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर काही दावे करण्यात होते की, भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली.

पाकिस्तानची उलट बोंब 

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले की, “आमच्या अण्वस्त्रांची सुरक्षा, कमांड आणि कंट्रोल स्ट्रक्चर अत्यंत सक्षम आणि सुरक्षित आहे. आमच्या अणु धोरणाबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

पण त्याच वेळी, पाकिस्तानने भारताच्या अणु धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी असा आरोप केला की, भारतातील राजकीय वातावरण, प्रसारमाध्यमे आणि काही सामाजिक घटकांमधील वाढता कट्टरतावाद हा अणु सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.

आता चर्चा फक्त पीओकेवर!

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर ठाम भूमिका घेतली. श्रीनगरमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली आणली गेली पाहिजेत. त्यांनी असेही म्हटले की, भारत आता आण्विक ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही आणि सीमापार दहशतवादाला सडेतोड उत्तर देईल.

भारतीय संसद सदस्य सध्या विविध देशांमध्ये जाऊन जागतिक समुदायाला पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवत आहेत. पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांना आश्रय देत नाही, तर त्यांना सक्रिय पाठबळही पुरवत आहे. भारताची भूमिका आता स्पष्ट आहे की,  पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा होणार असल्यास, ती फक्त पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यावरच होईल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर