शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 20:21 IST

British Navy Leaked Radioactive Water: आण्विक पदार्थ हे किरणोत्सारी असल्याने त्यापासून निर्माण होणारा आण्विक कचरा हा मानव आणि निसर्गासाठी धोकादायक असतो. त्यामुळे त्यांची हाताळणी अगदी जपून करावी लागते. दरम्यान, अशा आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावता हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक घटना ही ब्रिटनमध्ये घडली आहे.

आण्विक पदार्थ हे किरणोत्सारी असल्याने त्यापासून निर्माण होणारा आण्विक कचरा हा मानव आणि निसर्गासाठी धोकादायक असतो. त्यामुळे त्यांची हाताळणी अगदी जपून करावी लागते. दरम्यान, अशा आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावता हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक घटना ही ब्रिटनमध्ये घडली आहे. ब्रिटनमधील सर्वात गोपनीय आणि सुरक्षित लष्करी तळांपैकी एक असलेल्या स्कॉटलंडमधील लॉच लाँग किनाऱ्यावर असलेल्या कूलपोर्ट आर्मामेंट डेपोमधील किरणोत्सारी पाण्याची समुद्रात गळती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणीच ब्रिटनचं रॉयल नौदल आपल्या पाणबुड्यांसाठीच्या अण्वस्त्रांचा साठा ठेवते.  एका वृत्तानुसार प्रदूषणावर लक्ष ठेवणारी सरकारी संस्था असलेल्या स्कॉटिश एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या फाईल्समधून जुन्या आणि जीर्ण झालेल्या  १५०० पाईपलाईन फुटल्याने ही गळती झाली आहे.

या कागदपत्रांमधील नोंदींनुसार या तळावरील सुमारे अर्धे कंपोनेंट आपल्या आयु्र्मानापेक्षा अधिक जुने हो. मात्र त्यांची दुरुस्ती किंवा बदलण्याचं काम वेळीच झालं नाही. एसईपीएने दिलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१९ यादरम्यान, पाईप फुटण्याच्या घटना घडल्या. ऑगस्ट २०१९ मध्ये घडलेल्या घटनेत आण्विक हत्यारांवर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं. हे पाणि किरणोत्सारी पदार्थांच्या संपर्कात येऊन दूषित झालं. तसेच उघड्या नळीतून लोच लाँगमध्ये गेलं.

मात्र एसईपीएने सांगितले की, यातील किरणोत्साराचा स्तर खूप कमी होता. तसेच मानवी आरोग्यासाठी त्याच्यापासून तत्कालीन धोका नव्हता. मात्र हा अनावश्यक किरणोत्सारी कचरा होता. देखभार आणि व्यवस्थापनामधील त्रुटीमुले तो निर्माण झाला होता.

हे प्रकरण इथेच थांबलं नाही. २०२२ मध्ये एसईपीए ने रॉयल नेव्हीवर आणखी गंभीर आरोप केला. रॉयल नेव्हीने अण्वस्त्रे असलेल्या साठवून ठेवलेल्या क्षेत्रामधील उपकरणांची योग्य देखभाल केली नाही. तसेच पाईपलाईन बदलण्याची योजनाही अपूर्ण आणि पुरेशी नव्हती, असा आरोप एसईपीएने केला. अंतर्गत चौकशीनंतर मार्च २०२० मध्ये संरक्षण मंत्रालयाने २३ सुधारणात्मक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान ही माहिती सहा वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर ,स्कॉटिश माहिती आयुक्त डेव्हिड हेमिल्टन यांनी सरकारला या संदर्भातील माहिती जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर समोर आली आहे.  

टॅग्स :Englandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय