शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 14:31 IST

नुकतेच चीनच्या लोकसंख्येचे आकडे समोर आले होते. यातून चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले होते.

बिजिंग - वृद्ध होत चाललेली लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढीचा मंदावलेल्या वेग, यामुळे चिंतित चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता चीन सरकारने परिवार नियोजनाचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, आता चीनमध्ये कपल्स तीन मुलांना जन्म देऊ शकतील. यापूर्वी येथे केवळ दोन मुलेच जन्माला घालण्याची परवानगी होती. (Now three children can be born in China; China changed rules)

नुकतेच चीनच्या लोकसंख्येचे आकडे समोर आले होते. यातून चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले होते. अशात भविष्याचा विचार करता, चीनने हा निर्णय घेतला आहे. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या पॉलिसीला चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचीही परवानगी मिळाली आहे. अर्थात अनेक दशकांपासून चीनमध्ये सुरू असलेली टू-चाइल्ड पॉलिसी चीनने संपुष्टात आणली आहे.

चीननं दाखवला पाकिस्तानला ठेंगा; इम्रान खान यांना कर्ज माफीसाठी जोडावे लागले हात

चीनला का उचलावे लागले असे पाऊल ? -चीनने नुकतेच आपल्या लोकसंख्येचे आकडे प्रसिद्ध केले होते. यानुसार, गेल्या दशकात चीनमध्ये मुले जन्माला येण्याच्या वेगाची सरासरी सर्वात कमी होती. याचे कारण चीनमधील टू-चाइल्ड पॉलिसी असल्याचे सांगण्यात आले होते. आकडेवारीनुसार, 2010 ते 2020दरम्यान चीनमधील लोकसंख्या वाढीचा वेग 0.53% एवढा होता. तर वर्ष 2000 ते 2010 दरम्यान हा वेग 0.57% होता. अर्थात गेल्या दोन दशकांत चीनमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. 

एढेच नाही, तर आकडेवारीनुसार, वर्ष 2020मध्ये चीनमध्ये केवळ 12 मिलियन मुलेच जन्माला आली. तर 2016 मध्ये हा  आकडा 18 मिलियनवर होता. म्हणजेच चीनमध्ये 1960 नंतर मुले जन्माला येण्याचे प्रमाणही सर्वात कमी झाले.CoronaVirus: चीनची आता खैर नाही, कोरोना पूर्णत: मानवनिर्मितच; वैज्ञानिकांना मिळाले महत्वाचे पुरावे 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंग