शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आता बिनधास्त बसा ड्रायव्हरलेस रोबोटॅक्सीत! चालकविरहित प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 07:15 IST

ड्रायव्हरलेस म्हणजेच चालकविरहित कार्स !.. गेली काही वर्षं यासंदर्भात आपण सातत्यानं ऐकत, वाचत असलो तरी आता ही सेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हं आहेत.

ड्रायव्हरलेस म्हणजेच चालकविरहित कार्स !.. गेली काही वर्षं यासंदर्भात आपण सातत्यानं ऐकत, वाचत असलो तरी आता ही सेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हं आहेत आणि त्यासाठी लंडन या शहरानं आघाडी घेतली आहे. लंडनच्या रस्त्यांवर आता लवकरच ‘रोबोटॅक्सी’ पाहायला मिळतील. आपलीच कार सर्वांत आधी रस्त्यावर यावी यासाठी अनेक कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत लंडनच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या चालकविरहित टॅक्सी हे चित्र सामान्य झालेलं दिसू शकेल.

ड्रायव्हर नसलेल्या या कारला ‘रोबोटॅक्सी’ असं म्हटलं जातं. रोबोटॅक्सी ही चालकरहित, मागणीनुसार उपलब्ध होणारी वाहतूकसेवा आहे. आजूबाजूच्या हालचाली समजून घेण्यासाठी या कारमध्ये कॅमेरे, रडार आणि लिडारसारखे सेन्सर्स वापरले जातात. कलेक्ट केलेली सर्व माहिती सॉफ्टवेअर रिअल-टाइममध्ये रूपांतरित करतं आणि स्टीअरिंग, ब्रेकिंग, वेग इत्यादी गोष्टी नियंत्रित करतं. लंडनमध्ये होणाऱ्या बहुतांश चाचण्या ‘लेव्हल फोर’ ऑटोनॉमीवर केंद्रित असणार आहेत. याचा अर्थ या कार कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतः चालू शकतात, पण फक्त ठरवलेल्या क्षेत्रांत आणि परिस्थितींमध्येच. सुरुवातीच्या टप्प्यांत, या कारमध्ये ड्रायव्हर उपस्थित असू शकतो.

या रोबोटॅक्सी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअरवर अवलंबून असतात. स्वायत्ततेचा सर्वोच्च स्तर म्हणजे ‘लेव्हल फाइव्ह’. या टप्प्यावर रोबोटॅक्सी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चालू शकतात. सुरुवातीला रोबोटॅक्सी ‘लेव्हल फोर’ ऑटोनॉमीसह तैनात केल्या जातात, म्हणजे त्यांची देखरेख दुरून केली जाते. सध्या जवळपास सर्व रोबोटॅक्सी टेलिऑपरेशनद्वारे नियंत्रित केल्या जातात. टेलिऑपरेशन म्हणजे वायरलेस नेटवर्कद्वारे या कारवर दूरस्थ नियंत्रण असतं. यामुळे कंपन्यांना स्वायत्त ड्रायव्हिंगवर लक्ष ठेवता येतं, सिस्टीम प्रशिक्षणात मदत करता येते. याशिवाय आता कार पुढे कशी न्यायची, याबाबत अनिश्चितता असेल, तर हस्तक्षेप करता येतो.

अमेरिकेत टेलिऑपरेशनच्या वापरावर सुरक्षा समर्थक आणि नियामकांनी टीका केली आहे. त्यांचा युक्तिवाद आहे की दूरस्थ मानवी हस्तक्षेप कधी, कसा आणि किती वेळा होतो, तसेच त्यावर नियंत्रण ठेवणारे सुरक्षा उपाय काय आहेत, याबाबत ऑपरेटर्सनी पुरेशी पारदर्शकता ठेवलेली नाही. प्रतिसाद देण्याचा वेळ, ऑपरेटरवरचा ताण आणि टेलीऑपरेशनमुळे स्वायत्त व मानव नियंत्रित ड्रायव्हिंगमधली सीमा कितपत धूसर होते, यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यापुढचे महत्त्वाचे टप्पे तांत्रिक नसून नियामक असणार आहेत. कंपन्या सार्वजनिक चाचण्या सुरू करण्यासाठी मंजुरीची वाट पाहत आहेत. रोबोटॅक्सी संदर्भात लंडन शहार केवळ ब्रिटनसाठीच नाही तर संपूर्ण युरोपसाठी जणू एक चाचणी केंद्र बनण्यास सज्ज आहे. कारण लंडनमधली प्रचंड गर्दी, तिथलं अनिश्चित हवामान, रस्त्यांचं दाट जाळं आणि गुंतागुंतीची रचना.. यामुळे या रोबोटॅक्सी जर लंडनमध्ये यशस्वी झाल्या, तर संपूर्ण युरोपमध्ये आणि नंतर जगात त्याचा विस्तार होईल असं मानलं जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Driverless Robotaxis Coming to London: A New Era of Transportation

Web Summary : London gears up for robotaxis! Driverless cars, equipped with advanced sensors, are set to revolutionize urban transport, pending regulatory approvals. Testing focuses on Level Four autonomy.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीLondonलंडन