शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम्..! आता गायीच्या शेणानं आकाशात झेपावणार रॉकेट! पहिल्यांदाच इंजीनमध्ये दिसली LBMची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 14:55 IST

जपानमधील अभियंत्यांनी गायीच्या शेणापासून मिळणाऱ्या लिक्विड बायो मिथेनवर चालणाऱ्या एका नवीन प्रकारच्या रॉकेट इंजीनचे परीक्षण केले आहे...

आतापर्यंत गायीच्या शेणाचा वापर केवळ, खत, स्वयंपाकाचा गॅस आणि विविध धार्मिक विधीं यांसारख्या कामांतच होत होता. मात्र आता याचा वापर रॉकेटला अवकाशात पाठवण्यासाठीही केला जाऊ शकतो. जपानमधील अभियंत्यांनी गायीच्या शेणापासून मिळणाऱ्या लिक्विड बायो मिथेनवर चालणाऱ्या एका नवीन प्रकारच्या रॉकेट इंजीनचे परीक्षण केले आहे. यामुळे अधिक टिकाऊ प्रोपेलेंट विकसित होऊ शकते.

यासंदर्भात माहिती देताना स्टार्टअप इंटरस्टेलर टेक्नोलॉजीज इंकने (IST) एका निवेदनात म्हटले आहे की, रॉकेट इंजीनची, ज्याला झिरो म्हटले जाते, जापानमधील होक्काइडो स्पेसपोर्टमध्ये 10 सेकंदांपर्यंत "स्टॅटिक फायर टेस्ट" करण्यात आली. कंपनीने म्हटले आहे की, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल म्हणजेच झिरो हे लिक्विड बायो मिथेनवर (LBM) चालते. बायोमिथेन प्राण्यांच्या शेणापासून मिळते. हे कंपनीला होक्काइडो येथील डेअरी फार्ममधून मिळते.

IST ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रॉकेट इंजीनच्या परीक्षणाचे फुटेजही शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये इंजून चालू झाल्याचे दिसत आहे आणि त्यातून आकाशी निळ्या रंगाची आग निघतानाही दिसत आहे.

कसे तयार केले जाते एलबीएम इंधन? -कंपनी म्हटले आहे की, युरोपीय अतंराळ संस्थेने (ESA) अशा प्रकारचे रॉकेट इंजीन विकसित केल्यानंतर, एखाद्या खासगी कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे LBM ईंधन तयार केले आहे. महत्वाचे म्हणजे, रॉकेट इंजीन सायन्सच्या विकासात हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हणत, जगात असे पहिल्यांदाच घडले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, एलबीएम इंधन हे बायोगॅसचा मुख्य घटक असलेल्या मिथेनला वेगळे आणि शुद्ध करून, तसेच जवळपास 160 अंश सेल्सिअसवर द्रवीकरण करून तयार केले जाते. असेही कंपनीने म्हटले आहे. 

टॅग्स :Japanजपानcowगायscienceविज्ञान