शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:39 IST

Donald Trump- Elon Musk News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व टेस्ला, स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यात तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचा परिणाम अमेरिकेच्या भविष्यावर होण्याची भीती असल्याने ट्रम्प व मस्क यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष रिपब्लिकनने पुढाकार घेतला आहे.

वाॅशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व टेस्ला, स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यात तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचा परिणाम अमेरिकेच्या भविष्यावर होण्याची भीती असल्याने ट्रम्प व मस्क यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष रिपब्लिकनने पुढाकार घेतला आहे. दोघांनीही आपापसांतील मतभेद कमी करण्याची विनंती पक्षाने ट्रम्प व मस्क यांना केली आहे.

ट्रम्प व मस्क हे दोघेही अमेरिकेतील शक्तिशाली पुरुष आहेत. त्यांच्यातील वैरामुळे टॅरिफ व सीमा खर्च कायद्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या कायद्यासाठी ट्रम्प यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, मस्क यांनी ट्रम्पच्या कायद्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. जे काम आम्ही सुरू केले आहे, त्यावर ट्रम्प व मस्क यांच्यातील वादाचा परिणाम होणार नसल्याचे वॉशिंग्टन राज्याचे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी डॅन न्यूहाउस यांनी स्पष्ट केले.  या दोघांमधील वाददेखील लवकर संपतील असे ते म्हणाले. वादाच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते मस्कबद्दल विचारही करत नाहीत. ते काही काळ मस्कशी बोलणारही नाहीत.

दोघे नक्की एकत्र येतीलट्रम्प व मस्क या दोघांनी एकत्र काम केले तर अमेरिकेसाठी खूप काही करता येईल. त्यामुळे ते नक्की एकत्र येतील असा विश्वास टेक्सासचे रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूज यांनी व्यक्त केला.

एकमेकांना लक्ष्य करत टीका केल्याने झाला वाद शुक्रवारी दुपारपर्यंत मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य केले नव्हते. ते सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांसंदर्भात पोस्ट करत होते. दुसरीकडे ट्रम्प व्हाइट हाउसमधून बाहेर पडत न्यू जर्सीतील बेडमिन्स्टर येथील त्यांच्या गोल्फ क्लबकडे निघाले.  दोघांमधील वादासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळले. 

स्थलांतर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ४४ लोकांना अटकलॉस एंजेलिस : अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी स्थलांतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४४ लोकांना अटक केली आहे. अटकेच्या कारवाईला विरोध झाल्याने अधिकारी व लोकांमध्ये संघर्ष उडाला. या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. इमिग्रेशन व सीमाशुल्क अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी एजेंटच्या मदतीने शहरातील तीन ठिकाणी तपास अभियान राबवले. या दरम्यान किमान ४४ लोकांना अटक केल्याची माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते यास्मीन पिट्स यांनी दिली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी स्थलांतर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना दोन किराणा स्टोर, फॅशन डिस्ट्रिकचे एक गोदाम व एका डोनटच्या गोदामासह सात ठिकाणांहून अटक केल्याची माहिती कोलिशन ऑफ ह्यूमन इमिग्रंट राइट्सचे कार्यकारी संचालकांनी दिली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्क