शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता डास देणार लस! वटवाघळांपासून होणारा निपाह आणि रेबिजचा धोका टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 06:11 IST

या प्रयोगांतर्गत डास वटवाघळांना लस टोचतील, ज्यामुळे त्यांच्यातील व्हायरस मानवापर्यंत पोहोचणार नाहीत. यामुळे भविष्यात प्राण्यांमार्फत मानवामध्ये होणारे साथीचे आजार रोखणे शक्य होईल.

बीजिंग : जगभरातील शास्त्रज्ञ आता जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी एका अत्यंत अनोख्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. निपाह आणि रेबीजसारखे घातक आजार वटवाघळांमार्फत मानवामध्ये पसरण्याचा धोका असतो. हा धोका मुळापासून संपवण्यासाठी आता चक्क डासांचा वापर ‘लस वाहक’ म्हणून करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रयोगांतर्गत डास वटवाघळांना लस टोचतील, ज्यामुळे त्यांच्यातील व्हायरस मानवापर्यंत पोहोचणार नाहीत. यामुळे भविष्यात प्राण्यांमार्फत मानवामध्ये होणारे साथीचे आजार रोखणे शक्य होईल.

तंत्रज्ञानासमोर अनेक आव्हानेहा प्रयोग यशस्वी दिसत असला, तरी अनेक तज्ज्ञांनी यावर शंका उपस्थित केली आहे. डासांद्वारे लसीकरण नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे, कारण डास नक्की कोणाला चावतील हे ठरवणे मानवाच्या हातात नाही. तसेच, ज्या वटवाघळांमध्ये आधीच व्हायरस अस्तित्वात आहे, त्यांच्यात लसीकरणानंतर हा प्रसार खरोखर थांबेल का? याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.

पर्यायी मार्गांचा विचार सुरूकाही शास्त्रज्ञांच्या मते, डासांऐवजी ‘ड्रिंक स्टेशन’ तयार करणे अधिक सुरक्षित व प्रभावी ठरू शकते. यामध्ये वटवाघळे पाणी पिण्यासाठी येतात त्या ठिकाणी लसीचे मिश्रण असलेले द्रावण ठेवले जाईल. यामुळे वटवाघळांचे लसीकरण अधिक सोप्या पद्धतीने होऊ शकेल. सध्या या तंत्रज्ञानावर अधिक संशोधन सुरू आहे. 

कसा केला हा प्रयोग?या संशोधनामध्ये ‘एडिस इजिप्ती’ जातीच्या डासांचा वापर करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी या डासांना असे रक्त पाजले ज्यामध्ये निपाह किंवा रेबीज व्हायरस विरुद्धची लस आधीच उपलब्ध होती. हे रक्त डासांच्या शरीरात गेल्यानंतर त्यातील लस त्यांच्या लाळ ग्रंथींपर्यंत पोहोचली.प्रयोगशाळेत वटवाघळांना हे डास चाव लेवटवाघळांनी या डासांना खाल्ले, तेव्हा त्यांच्या शरीरात लसीचे अंश पोहोचले. लॅबमध्ये उंदीर व वटवाघळांच्या चाचणीत त्यांच्या शरीरात व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडीज तयार झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

टॅग्स :chinaचीनscienceविज्ञान