शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

आता गाझात ग्राउंड अ‍ॅटॅक, आपल्या नागरिकांना बंदुका वाटतोय इस्रायल; अमेरिकेनंही दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 13:27 IST

युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत...

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 21 दिवसांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत जवळपास 9 हजार लोक मारले गेले आहेत. हे युद्ध आता आणखी रौद्र रूप धारण करण्याची चिन्ह आहेत. आता इस्रायलने आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार करायला सुरुवात केली आहे. इस्रायल त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देणार आहे. इस्रायलचे पोलीसमंत्री इतामार बेन ग्विर यांनी इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्कलोनमधील नागरिकांना शस्त्रास्त्रे वाटली आहेत. तसेच, युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.

यातच, युद्धाची भयानक वेळ आली असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत, लिंडा थॉमस ग्रीनफील्ड म्हणाल्या, आपण भयंकर क्षणी भेटत आहोत, हा क्षण इस्रायली आणि पॅलेस्टिनींसाठी भयंकर आहे. हा क्षण संपूर्ण जगासाठीच अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या डोळ्यांदेख होणारे मृत्यू आणि विनाश आणि निराशेचा हा खेळ माणुसकीवरील विश्वास उडवण्यासाठी पुरेसा आहे.

6 ऑक्टोबरच्या यथास्थितीत जाणे अशक्य -लिंडा थॉमस ग्रीनफील्ड म्हणाल्या, राष्ट्रपती बायडेन यांनी म्हटल्याप्रमाणे, 6 ऑक्टोबरच्या स्थितीत जाणे अशक्य आहे.  आपण तसे करू नये. हमास इस्रायलमध्ये दहशत निर्माण करतो आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांना ढाल म्हणून वापरत आहे. आपण त्या स्थितीतही जाऊ नये, जेथे जहशतवादी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवर हल्ला करू शकतात आणि दहशत माजवू शकतात. यथास्थिती अस्थिर असून ती स्वीकार करण्यासारखी नाही. अर्थात, हे संकट जेव्हा संपुष्टात येईल. तेव्हा पुढे काय असेल? यासंदर्भात दृष्टीकोण असायला हवा. हा दृष्टिकोण टू स्टेट सोल्यूशन भोवती फिरणारा असेल.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धPalestineपॅलेस्टाइनIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष