शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता अंतराळातही जन्माला घालता येणार मुले! आयव्हीएफ उपचारांद्वारे मानवी भ्रूण तयार केले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 09:20 IST

एका अहवालानुसार, ब्रिटिश शास्त्रज्ञ स्पेसबॉर्न युनायटेडच्या सहकार्याने असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी इन स्पेस मॉड्यूल बनवत आहेत.

न्यूयॉर्क : १९६१ मध्ये मानव पहिल्यांदा अंतराळात गेला. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की मुले अंतराळात जन्माला येतात का? जगभरातील शास्त्रज्ञ ६२ वर्षांनंतरही हे गूढ उकलू शकलेले नाहीत. मात्र, ब्रिटन आणि नेदरलँडचे शास्त्रज्ञ लवकरच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार आहेत.

एका अहवालानुसार, ब्रिटिश शास्त्रज्ञ स्पेसबॉर्न युनायटेडच्या सहकार्याने असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी इन स्पेस मॉड्यूल बनवत आहेत. या अंतर्गत अंतराळात जैव उपग्रह पाठवण्यात येणार आहे. याच्या आत,इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) उपचाराद्वारे गर्भाचा जन्म होईल. त्यानंतर त्याला पृथ्वीवर आणून स्त्रीच्या गर्भात सोडले जाईल. पृथ्वीवर जन्माला आलेल्या या मुलांना ‘स्पेस बेबीज’ म्हटले जाईल.

कशी असेल प्रक्रिया?७५ सेंमीच्या एका डिस्कमध्ये संशोधक आयव्हीएफ उपचाराचे यंत्र ठेवतील. - डिस्कला पृथ्वीपासून २३० किमी वर पाठवले जाईल. येथे किरणोत्सर्ग मर्यादित असतो.- आयव्हीएफ यंत्र स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी तयार करेल. त्याच्या नियंत्रित तापमानात शुक्राणू आणि अंडी फर्टिलाइज होईल.- भ्रूण तयार झाल्यानंतर ५ दिवसांनी त्याला फ्रिज करून पृथ्वीवर आणण्यात येईल.

निवड कशी होणार?गरोदर स्त्रिया आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली जाईल. ज्या महिलांवर हा प्रयोग केला जाईल त्यांना किमान दोन यशस्वी प्रसूतीचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यांच्या शरीरात उच्च किरणोत्सर्ग सहन करण्याची ताकद देखील असली पाहिजे.

स्पेसबॉर्नचे संस्थापक डॉ. एगबर्ट एडेलब्रोक म्हणाले की, या प्रकल्पाचा अंतिम उद्देश पृथ्वीच्या बाहेर नैसर्गिकरीत्या मुले निर्माण करणे हा आहे. मात्र, त्याआधी तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे. यानंतरच अंतराळात सेक्स, गर्भधारणा आणि प्रसूतीवर लक्ष केंद्रित केले जाईल.

पहिला प्रयोग उंदरांवर- या प्रकल्पासाठी पहिला प्रयोग उंदरांवर केला जाणार आहे. त्यांचे शुक्राणू आणि अंडी अंतराळात फलित होतील. मॉड्यूलच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणारे पहिले उड्डाण एप्रिलमध्ये कॅनडातून उड्डाण करेल. - संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आयव्हीएफ असलेला एक पूर्ण-कार्यक्षम जैव-उपग्रह १८ ते २४ महिन्यांत तयार होईल. उंदरांवर प्रयोग झाल्यानंतर लवकरच मनुष्यावर ही त्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाPregnancyप्रेग्नंसी