शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाम संघर्षानंतर आता चीन नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 17:45 IST

भारताच्या दबावानंतर चीननं सिक्कीममधल्या डोकलाममधून माघार घेतल्यानंतर चीननं नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय भाविकांसाठी नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असंही चीननं म्हटलं आहे. 

बीजिंग, दि. 12 - भारताच्या दबावानंतर चीननं सिक्कीममधल्या डोकलाममधून माघार घेतल्यानंतर चीननं नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय भाविकांसाठी नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असंही चीननं म्हटलं आहे. 

डोकलाममधील संघर्षानंतर नाथू लामधील रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो रस्ता पुन्हा खुला करण्यास चीननं सहमती दर्शवली आहे. चीन नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्यासह भारतीय तीर्थक्षेत्राला जाणा-या भाविकांसह इतर मुद्द्यांवरही भारतासोबत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी दिली आहे. भारत व चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ डोकलाम सीमेवरून संघर्ष सुरू होता. परंतु चीन व भारतानं एकत्र सैन्य माघारी घेतल्यानं या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. ....असा जातो नाथू ला मार्ग2015मध्ये चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी नाथू ला खिंडीतील मार्ग खुला केला होता. हा मार्ग तिबेटमार्गे नाथू ला खिंडीतून जातो. हिमालयातील सिक्कीम नाथू ला मार्ग समुद्र सपाटीपासून 4 हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू या मार्गानं जाऊ शकत होते. सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, 2013 साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब आणि नादुरुस्त झाला होता.(सीमेवरून लष्कर हटवा अन्यथा मानसरोवरचा रस्ता बंद, चीनची भारताला धमकी)(चीन म्हणते, आम्ही नव्हे, भारतानेच केली घुसखोरी!)उत्तराखंड आणि नेपाळमार्गे कैलासकडे जाणारा मार्ग नैसर्गिक रचनेमुळे अवघड आहे, या मार्गावर बराच प्रवास खेचराच्या पाठीवर बसून करावा लागतो. याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी यांनी कैलास यात्रेसाठी दुसऱ्या मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. नाथू ला खिंडीतून जाणाऱ्या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना 1500 किमीच्या मार्गापर्यंत बसने जाता येत होते. हा नवा मार्ग सुरू करण्यासाठी तिबेटी लोकांनी बरीच तयारी केली होती. या 1 हजार यात्रेकरूना दरवर्षी परवाना दिला जातो. 18 तुकड्यांत हे लोक यात्रेसाठी पाठवले जातात. ही संपूर्ण यात्रा 23 दिवसांची असून 19 दिवस प्रवासात तर चार दिवस वैद्यकीय तपासणीसाठी असतात. यात्रेचा एकूण खर्च दर माणसी 1.80 लाख रुपये येतो.

टॅग्स :chinaचीन