शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

येशू ख्रिस्त नव्हे शी जिनपिंगच तुम्हाला वाचवतील! येशूचे फोटो काढून त्याजागी लावा चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 13:29 IST

येशू तुमची गरीबी किंवा आजारपण दूर करु शकत नाही पण कम्युनिस्ट पार्टी तुम्हाला दु:खातून मुक्ती देऊ शकते.

ठळक मुद्देजियांक्षी प्रांत गरीबी आणि तिथे मोठया प्रमाणावर राहणा-या ख्रिश्चन समुदायासाठी ओळखला जातो. गावातील लोकांनी स्वेच्छेने ख्रिश्चन धर्माशी संबंधित 624 पोस्टर्स हटवले असून, त्याजागी 453 ठिकाणी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे फोटो लावले आहेत.

बिजींग - येशू ख्रिस्त नव्हे शी जिनपिंगच तुमची गरीबी दूर करु शकतात. त्यामुळे भिंतीवरुन येशू ख्रिस्ताचा फोटो काढा व तिथे जिनपिंग यांचा चांगला फोटो लावा असा प्रचार चीनमध्ये सुरु आहे. चीनच्या शासकीय यंत्रणेतील अधिकारीच तसा प्रचार करत आहेत.  चीनच्या दक्षिण पूर्व युगान प्रांतात राहणा-या ख्रिश्चन नागरिकांना भिंतीवरुन येशू ख्रिस्ताचा फोटो काढून तिथे जिनपिंग यांचा फोटो लावण्यास सांगण्यात आले आहे. 

येशू तुमची गरीबी किंवा आजारपण दूर करु शकत नाही पण कम्युनिस्ट पार्टी तुम्हाला दु:खातून मुक्ती देऊ शकते असे हे अधिकारी सांगत आहेत. जियांक्षी प्रांत गरीबी आणि तिथे मोठया प्रमाणावर राहणा-या ख्रिश्चन समुदायासाठी ओळखला जातो. या प्रांतातील दहा लाख नागरिकांपैकी 11 टक्क्यांपेक्षा जास्त लोक दारिद्रय रेषेखाली राहतात. 

वॉशिंग्टन पोस्टने युगान प्रांतातील सोशल मीडिया अकाऊंटच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार गावातील लोकांनी स्वेच्छेने ख्रिश्चन धर्माशी संबंधित 624 पोस्टर्स हटवले असून, त्याजागी 453 ठिकाणी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे फोटो लावले आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने गरीबी निर्मूलनाची मोहिम हाती घेतली आहे. पक्षाचे सदस्य गावोगावचा दौरा करुन पक्ष कशा प्रकारे शेतक-यांच्या पाठिशी आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. 2020 पर्यंत गरीबी हटवण्याला चीनने आपले पहिले प्राधान्य दिले आहे. फक्त राजकीय दृष्टीकोनातून नव्हे तर समाजातील तळगाळापर्यंत नियंत्रण मिळवणे हा सुद्धा या मोहिमेमागे उद्देश आहे.   

युद्धासाठी सज्ज रहा - शी जिनपिंग यांचे चिनी लष्कराला आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नव्या नेतृत्वाबरोबर पहिली बैठक झाली. चिनी लष्कराला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हटले जाते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने 19 व्या काँग्रेस परिषदेत केंद्रीय लष्करी आयोगावर नव्या सदस्यांची निवड केली आहे. या सदस्यांबरोबर शी जिनपिंग यांनी चर्चा केली. यावेळी जिनपिंग यांनी  पीपल्स लिबरेशन आर्मीला युद्ध जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला तसेच युद्धासाठी सज्ज राहण्यासही सांगितले. 

युद्ध कसे जिंकता येईल त्यावर लक्ष द्या तसेच लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर (मॉर्डनायझेशन) भर देण्यास सांगितले. 2050 पर्यंत जगातील शक्तीशाली, सर्वोत्तम लष्कर उभे करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या बैठकीच्यावेळी शी जिनपिंग लष्करी गणवेशात होते. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना पक्षासोबत पूर्णपणे एकनिष्ठ रहाण्याचा आदेश दिला. 2035 पर्यंत चिनी लष्कराची मॉर्डनायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलाम