शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Nostradamus Predictions for 2022: नवे वर्ष विनाशकारी! अणुबॉम्ब हल्ल्यानंतर शांतता, मानवाचा अंत; नॉस्ट्रॅडॅमसची भयावह भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 16:46 IST

Nostradamus Predictions for 2022: नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत असेही म्हटले आहे की 2022 मध्ये संगणकाचा मेंदू मानवांवर नियंत्रण ठेवू शकतो. येत्या वर्षभरात, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी इंटरफेससह संगणकावर राज्य करेल. या रोबोट्समुळे मानवजातीचा अंत होईल.

फ्रान्सचे जगप्रसिद्ध ज्योतिषी माइकल दि नॉस्ट्रॅडॅमस यांनी जगाबाबत हैराण करणाऱ्या भविष्यवाणी केल्या होत्या. नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या एका पुस्तकात हजारो अशा घटनांची नोंद केली होती, ज्या भविष्यात जगभरात विध्वंस करणार होत्या. नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जग विश्वास ठेवते. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती खरी ठरली आहेत. (Nostradamus Predictions for 2022)

नॉस्ट्रॅडॅमसने 2022 साठी ज्या भविष्यवाण्या केल्या आहेत त्या जगासाठी चिंतेचा विषय ठरणार आहेत. त्यांनी 2022 मध्ये मोठमोठ्या संकटांचे संकेत दिले आहेत. नॉस्ट्रॅडॅमसने 2022 बाबत केलेल्या भविष्यवाणीत म्हटले आहे की, पृथ्वीला खूप मोठे नुकसान होणार आहे. महत्वाचे म्हणजे हे नुकसान उल्कापिंडामुळे होणार आहे. विशालकाय दगड समुद्रात कोसळल्याने मोठमोठ्या लाटा उसळणार आहेत. ज्या जमिनीला घेरणार आहेत. तसेच समुद्राच्या जलस्तरात वाढ झाल्याने मोठे नुकसान होणार आहे.

नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये महागाई बेलगाम होणार आहे. वेगाने अमेरिकी डॉलर कोसळणार आहे. 2022 मध्ये लोक सोने. चांदी आणि बिटक़ॉईनलाच संपत्ती समजू लागणार आहेत. यामध्ये लोक जास्त पैसा गुंतवू लागतील आणि हेच कारण पृथ्वीला उद्ध्वस्त करणार आहे.

नॉस्ट्रॅडॅमसच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये अणुबॉम्बच्या स्फोटामुळे हवामानात बदल होईल. यासोबतच पृथ्वीच्या स्थितीतही बदल होऊ शकतो.2022 मध्ये विनाशानंतर शांतता नांदेल, असे नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे. याआधी ७२ तास जग अंधारात लोटले जाईल. शरद ऋतूतील पर्वतांवर बर्फवृष्टी होऊ शकते. एका नैसर्गिक घटनेमुळे अनेक देशांमधील युद्ध संपुष्टात येईल. तीन दिवस जग अंधारात असेल आणि त्यानंतर आधुनिक जीवन संपेल.

2022 मध्ये फ्रान्सवर मोठे संकट येणार आहे. देशात मोठे वादळ येईल जे विनाश घडवेल. त्यामुळे जगातील अनेक भागात भीषण आग, दुष्काळ आणि पूर अशी परिस्थिती निर्माण होईल. 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर भूकबळीची समस्या जाणवेल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत असेही म्हटले आहे की 2022 मध्ये संगणकाचा मेंदू मानवांवर नियंत्रण ठेवू शकतो. येत्या वर्षभरात, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी इंटरफेससह संगणकावर राज्य करेल. या रोबोट्समुळे मानवजातीचा अंत होईल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष