शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

किम जोंग उन गेले कोमात?; आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या दाव्यानंतर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 08:48 IST

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबतच्या उलटसुलट चर्चा, दावे सुरूच आहेत.

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत दक्षिण कोरियाने या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र आता किम जोंग उन कोमात गेले असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymail या वृत्तपत्राने केला आहे.

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती असतानाच चीनमधील डॉक्टरांचे एक पथक उत्तर कोरियाला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबतच्या उलटसुलट चर्चा, दावे सुरूच आहेत. दक्षिण कोरियातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, किम जोंग उन हे जिवंत असून लवकरच लोकांसमोर येणार आहेत. किम जोंग उन हे लोकांसमोर येत नाहीत, याचा अर्थ त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असा अर्थ होत नाही असेही या अधिकाऱ्याने सांगतिले. 

 

दरदिवशी किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत आहेत. तसेच ह्यंग सॅन येथे किम जोंग उन यांच्यावर  शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किम जोंग उनवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाchinaचीनAmericaअमेरिकाSouth Koreaदक्षिण कोरिया