शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाने केले दहा पट शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 13:13 IST

उत्तर कोरियाने आपल्या आक्रमक कारवाया सुरूच ठेवताना आज पुन्हा एकदा अणुचाचणी घेतली आहे. जपानने उत्तर कोरियाकडून घेण्यात आलेल्या सहाव्या अणुचाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान उत्तर कोरियानेही आज घेतलेली अणुचाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. 

टोकियो, दि. 3 - उत्तर कोरियाने आपल्या आक्रमक कारवाया सुरूच ठेवताना आज पुन्हा एकदा अणुचाचणी घेतली आहे. जपानने उत्तर कोरियाकडून घेण्यात आलेल्या सहाव्या अणुचाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान उत्तर कोरियानेही आज घेतलेली अणुचाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाने आज घेतलेल्या  हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीतील स्फोटाची शक्ती ही त्यांच्या आधीच्या अणुचाचणीच्या तुलनेत दहापट अधिक होती.जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांनी सांगितले की, हवामान खाते आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या माहितीनंतर जपान सरकार उत्तर कोरियाकडून करण्यात आलेल्या अणुचाचणीच्या वृत्ताला दुजोरा देत आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाने परीक्षण केलेल्या हायड्रोजन बॉम्बची क्षमता आधी परीक्षण करण्यात आलेल्या अणुस्फोटांपेक्षा 9 पट अधिक होती. उत्तर कोरियाने याआधी अणुचाचण्या केलेल्या ठिकाणी जमीन हलल्याची माहिती भूकंपतज्ज्ञांना मिळाली आहे. त्याबरोबरच चीन आणि अमेरिकेनेही हा एक स्फोट असल्याचे सांगितले आहे.  

 उत्तर कोरियाकडून आज हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हा बॉम्ब नव्वाने विकसित करण्यात आलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्रावरून वाहून नेता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तसेच तो आधीच्या अणुचाचण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. असे कोरियाकडून सांगण्यात आले. किम जोंग उन यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी पूर्णपणे यशस्वी आणि देशाच्या अणुकार्यक्रमाच्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरली आहे, असे कोरियन वृत्तवाहिनीने सांगितले.

 हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय? हायड़्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो. अणुबॉम्बमध्ये स्फोट घडवण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो. संमिलनाची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडवण्यासाठी अणुस्फोट केला जातो. त्यामुळे हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यांच्यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्य़ा प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. शितयुद्धाच्या काळात 1952 साली अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले होते. तर 1961 साली रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते. मात्र भयंकर संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बचा अद्याप युद्धात वापर करण्यात आलेला नाही.