शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले क्षेपणास्त्र, कोरियन द्विपकल्पात तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 04:40 IST

गेल्या काही दिवसांपासून कोरियन द्विपकल्पासह जागतिक शांततेसाठी आव्हान ठरत असलेल्या उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आगळीक केली आहे.  शुक्रवारी पहाटे उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयोंग येथून जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले.

सेऊल, दि, 15 - गेल्या काही दिवसांपासून कोरियन द्विपकल्पासह जागतिक शांततेसाठी आव्हान ठरत असलेल्या उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आगळीक केली आहे.  शुक्रवारी पहाटे उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयोंग येथून जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले. दरम्यान उत्तर कोरियाच्या शक्तिप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियानेही तातडीने बँलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण केले.

शुक्रवारी उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र उत्तर जपानमधील होकाईदो बेटावरून गेले. उत्तर कोरियाच्या आगळीकीमुळे जपानने आपल्या नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. तसेच जपान आणि दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्राच्या परीक्षणाला दुजोरा दिला आहे.  

 

उत्तर कोरिया लवकरच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्याच्या तयारीत आहे. आम्ही बनवणा-या मिसाइल जपानवर हल्ला करण्यासाठी सक्षम असून, या मिसाइल अमेरिकन सेनेच्या मुख्य ठिकाणांनाही लक्ष्य करणार असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं होतं. उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वीच मिसाइल परीक्षण केले होते.   सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं चाचणीदरम्यान 500 किलोमीटरचे अंतर पार करत 560 किलोमीटर उंचावरून मारा केला. त्यानंतर मिसाइल प्रशांत महासागरात प्रवेशकर्ती झाली. या मिसाइलचं परीक्षण किम जोंग ऊन यांच्या देखरेखीखाली झालं. किम जोंग उन हे या मिसाइल परीक्षणामुळे संतुष्ट असून, या प्रकारच्या मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, असं वृत्त एका स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलं आहे. KCNAच्या मते, या मिसाइलची लक्ष्य भेदण्याची क्षमता अचूक असून, सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं आमचं सर्वात यशस्वी सामरिक शस्त्र असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच या मिसाइल कोरियन कोरियन द्विपकल्पात तैनात करण्याचेही किम जोंग उन यांनी आदेश दिले आहेत. अमेरिकेनं वारंवार इशारा देऊनही उत्तर कोरियानं स्वतःचं मिसाइल परीक्षण थांबवलेलं नाही. अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या मिसाइल परीक्षणावरून त्यांना इशारा देत सांगितलं होतं की, उत्तर कोरियानं मिसाइल परीक्षण न थांबवल्यास त्यांचाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. उत्तर कोरिया आणि अमेरिकेच्या वादामुळे कोरियन द्विपकल्पाचं पूर्ण क्षेत्र प्रभावित झालं आहे.