शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kim Jong Un: उत्तर कोरियाचा आता संपूर्ण जगावर ‘डोळा’, किम जोंग उनचे खतरनाक इरादे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:24 IST

Kim Jong Un: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा आणखी एक धोकादायक डाव उघडकीस आला आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा आणखी एक धोकादायक डाव उघडकीस आला आहे. किम जोंगने सांगितले की, उत्तर कोरियाच्या पहिल्या लष्करी हेरगिरी उपग्रहाचं काम पूर्ण झालं आहे. तसेच अधिकाऱ्यांना निश्चित योजनेप्रमाणे त्याचे प्रक्षेपण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, मंगळवारी उत्तर कोरियाच्या एअरोस्पेस एजन्सीचा दौरा सुरी असताताना किमने सांगितले की, अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांपासून संरक्षणाला असलेल्या धोक्याचा विचार करून अंतराळावर आधारित टेहळणी प्रणाली मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. 

उत्तर कोरियाने सांगितलं की, त्यांनी अमेरिका आणि त्याचे प्रादेशिक सहकारी दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी अभ्यासाला प्रत्युत्तर म्हणून,  मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचाही समावेश आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेवर हल्ल्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. 

केसीएनएच्या म्हणण्यानुसार किमने राष्ट्रीय एअरोस्पेस विकास प्राधिकरणामध्ये सांगितले की, युद्ध थांबवण्यासाठी आपल्या पद्धतींचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी उत्तर कोरियाकडून लष्करी टेहळणी करणं महत्त्वपूर्ण आहे. 

किम जोंग उनने सांगितले की, लष्करी टेहळणी उपग्रहाची बांधणी एप्रिल महिन्यात करण्यात आली आहे. त्याने आदेश दिले आहेत की, या प्रक्षेपणाशी संबंधित तयारीला अंतिम रूप देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. मात्र उपग्रह प्रक्षेपणाच्या तारखेबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.  

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया