उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा राग कसा शेंड्यावर असतो हे साऱ्यांनाच माहीत आहे. ‘अरे’ला ‘कारे’ करायला त्यांना फार आवडतं आणि त्यामुळेच खरं तर ते जगात प्रसिद्ध आहेत. जो कोणी आपल्या विरोधात जाईल किंवा आपल्या विरोधात जातोय असं त्यांना वाटतं, त्या प्रत्येकाला, प्रत्येक देशाला आपले दंड फुगवून दाखवण्याचाही त्यांचा नेहमीचा शिरस्ता आहे.
यात सर्वांत आघाडीवर आहे तो म्हणजे अमेरिका हा देश. अमेरिका त्यांना कायम डिवचत असतो आणि मग किम जोंग उनही त्यापेक्षा मोठ्यानं डरकाळी फोडत ‘तुम्हाला भस्मसात करू’ म्हणत त्यांना धमकावत असतात. उत्तर कोरियानं आपल्या अण्वस्त्र निर्मितीचा उपक्रम थांबवावा म्हणून अमेरिकेनं त्यांना कायमच दम दिला आहे आणि उत्तर कोरियानं, पर्यायानं किम जोंग उन यांनीही त्यांना कायमच वाकुल्या दाखवत आपल्याला जे करायचं तेच केलं आहे.
किम जोंग उन यांच्या रडारवर आता आहे तो म्हणजे जपान. सध्या जपानवर ते फारच भडकले आहेत. त्यामुळे जपानलाही थेट धमकी देताना त्यांनी म्हटलं आहे, तुम्हाला सोडणार नाही, नष्ट करून टाकू तुम्हाला. आमच्याशी पंगा घेतलात, तर त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही स्वत:हून कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी आमच्या वाटेत आला तर त्याला सोडतही नाही, या शब्दांत किम जोंग उन यांनी जपानला खडसावलं आहे.
किम जोंग उन यांचा पापड मोडण्याचं कारणही तसंच आहे. कारण जपाननं नुकतंच जाहीर केलंय.. आमच्या एका बेटावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं तैनात करण्याचा आमचा विचार आहे. त्यादृष्टीनं आमची तयारी सुरू झाली आहे. किम जोंग उन यांचं पित्त खवळलं आहे ते यामुळेच. जपानला धमकावताना त्यांनी म्हटलं आहे, खबरदार, असलं काही करण्याचा नुसता विचार जरी तुम्ही मनात आणला तर!.. त्याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा..
उत्तर कोरियाचं म्हणणं आहे, हा प्रकार म्हणजे आशिया खंडात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रकार आम्ही हाणून पाडू. अमेरिका, जपानसारखे देश कायम आमच्याविरोधात कारवाया करण्याचा प्रयत्न करीत असतात. आमच्या देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचेल असे उद्योग करत राहणं, आम्हाला डिवचत राहणं हा त्यांचा कायमचा धंदा आहे. पण अशानं ते स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत हेही त्यांनी नीट लक्षात घ्यावं. आमच्या परिसरातील शांती भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांतच राहू द्या. मुद्दाम जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर ते कोणाच्याच भल्याचं होणार नाही..
उत्तर कोरियाचं म्हणणं आहे, अलीकडेच अमेरिका आणि जपान यांनी एकत्र येऊन आमच्या सीमेवर सैन्य वाढवण्याचा, आमच्यावर दबाव टाकण्याचा, आम्हाला घाबरवण्याचाही प्रयत्न केला आहे. का करताहेत ते असं? त्यांच्या या कृतीनं आम्ही खरोखरच घाबरणार आहोत का? उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी तर असे प्रकार जपान आणि अमेरिकेला नक्कीच जड जातील असं सांगून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर कोरियाची अमेरिका आणि जपानशी जुनी दुष्मनी आहे. ही दुष्मनी जगाच्याही शांततेच्या दृष्टीनं घातक बनली आहे.उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा राग कसा शेंड्यावर असतो हे साऱ्यांनाच माहीत आहे. ‘अरे’ला ‘कारे’ करायला त्यांना फार आवडतं आणि त्यामुळेच खरं तर ते जगात प्रसिद्ध आहेत. जो कोणी आपल्या विरोधात जाईल किंवा आपल्या विरोधात जातोय असं त्यांना वाटतं, त्या प्रत्येकाला, प्रत्येक देशाला आपले दंड फुगवून दाखवण्याचाही त्यांचा नेहमीचा शिरस्ता आहे.
यात सर्वांत आघाडीवर आहे तो म्हणजे अमेरिका हा देश. अमेरिका त्यांना कायम डिवचत असतो आणि मग किम जोंग उनही त्यापेक्षा मोठ्यानं डरकाळी फोडत ‘तुम्हाला भस्मसात करू’ म्हणत त्यांना धमकावत असतात. उत्तर कोरियानं आपल्या अण्वस्त्र निर्मितीचा उपक्रम थांबवावा म्हणून अमेरिकेनं त्यांना कायमच दम दिला आहे आणि उत्तर कोरियानं, पर्यायानं किम जोंग उन यांनीही त्यांना कायमच वाकुल्या दाखवत आपल्याला जे करायचं तेच केलं आहे.
किम जोंग उन यांच्या रडारवर आता आहे तो म्हणजे जपान. सध्या जपानवर ते फारच भडकले आहेत. त्यामुळे जपानलाही थेट धमकी देताना त्यांनी म्हटलं आहे, तुम्हाला सोडणार नाही, नष्ट करून टाकू तुम्हाला. आमच्याशी पंगा घेतलात, तर त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही स्वत:हून कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी आमच्या वाटेत आला तर त्याला सोडतही नाही, या शब्दांत किम जोंग उन यांनी जपानला खडसावलं आहे.
किम जोंग उन यांचा पापड मोडण्याचं कारणही तसंच आहे. कारण जपाननं नुकतंच जाहीर केलंय.. आमच्या एका बेटावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं तैनात करण्याचा आमचा विचार आहे. त्यादृष्टीनं आमची तयारी सुरू झाली आहे. किम जोंग उन यांचं पित्त खवळलं आहे ते यामुळेच. जपानला धमकावताना त्यांनी म्हटलं आहे, खबरदार, असलं काही करण्याचा नुसता विचार जरी तुम्ही मनात आणला तर!.. त्याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा..
उत्तर कोरियाचं म्हणणं आहे, हा प्रकार म्हणजे आशिया खंडात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रकार आम्ही हाणून पाडू. अमेरिका, जपानसारखे देश कायम आमच्याविरोधात कारवाया करण्याचा प्रयत्न करीत असतात. आमच्या देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचेल असे उद्योग करत राहणं, आम्हाला डिवचत राहणं हा त्यांचा कायमचा धंदा आहे. पण अशानं ते स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत हेही त्यांनी नीट लक्षात घ्यावं. आमच्या परिसरातील शांती भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांतच राहू द्या. मुद्दाम जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर ते कोणाच्याच भल्याचं होणार नाही..
उत्तर कोरियाचं म्हणणं आहे, अलीकडेच अमेरिका आणि जपान यांनी एकत्र येऊन आमच्या सीमेवर सैन्य वाढवण्याचा, आमच्यावर दबाव टाकण्याचा, आम्हाला घाबरवण्याचाही प्रयत्न केला आहे. का करताहेत ते असं? त्यांच्या या कृतीनं आम्ही खरोखरच घाबरणार आहोत का? उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी तर असे प्रकार जपान आणि अमेरिकेला नक्कीच जड जातील असं सांगून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर कोरियाची अमेरिका आणि जपानशी जुनी दुष्मनी आहे. ही दुष्मनी जगाच्याही शांततेच्या दृष्टीनं घातक बनली आहे.