किम जोन उन यांच्या बहिणीचं पावलावर पाऊल; ‘मोठ्या वादळाची तयारी करा,’ अमेरिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 11:45 PM2023-04-30T23:45:25+5:302023-04-30T23:46:25+5:30
किम योंग जोंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना वृद्ध आणि बेजबाबदार धाडसी असं संबोधलं.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनीदेखील आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवलंय. मोठ्या वादळासाठी तयार राहा, असं सांगत त्यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियाला इशारा दिला. वास्तविक, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील अणुकरारामुळे उत्तर कोरियानं संताप व्यक्त केलाय. किम जोंग उन यांची बहीण किम योंग जोंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना वृद्ध आणि बेजबाबदार धाडसी संबोधलं.
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार, उत्तर कोरियाच्या आण्विक धोक्याला तोंड देण्यासाठी अमेरिका दक्षिण कोरियामध्ये अण्वस्त्रे तैनात करेल, तसंच सेऊलच्या अण्विक कार्यक्रमाला मदत करेल. यामुळे आता उत्तर कोरिया संतापला आहे.
ही केवळ धमकी देणारं वक्तव्य नाही. बायडेन यांनी मोठ्या वादळासाठी तयार राहावं, असं उत्तर कोरियाची वृत्तसंस्था केसीएननं म्हटलं. जितला आमचा शत्रू युद्धाभ्यासासाठी तयार आणि आहे आणि जितक्या अण्वस्त्रांची तैनाती करत आहे, आम्ही स्वसंरक्षणासाठी तितकंच अधिक काम करू. अमेरिका आणि दक्षिण कोरियाला आता आणखी शक्तिशाली शक्तीचा सामना करावा लागणार असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलंय.